मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालकडे गुड न्यूज आहे. अर्जुन लवकरच तिसऱ्यांदा बाबा बनणार आहे. त्याची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स प्रेग्नंट आहे. स्वत: अर्जुनने इन्स्टाग्रामवर ही गुड न्यूज शेअर केली आहे.

अर्जुन रामपाल आणि साऊथ आफ्रिकेची मॉडेल आणि अभिनेत्री गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांनी नुकतीच आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. बऱ्याच काळापासून ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. गॅब्रिएला 'सोनाली केबल' या चित्रपटात दिसली होती.

अर्जुन रामपालने गॅब्रिएलासोबतचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यात ती प्रेग्नंट असल्याचं दिसत आहे. "मी फारच सुदैवी आहे की, मला तू भेटलीस आणि नवी सुरुवात झाली. थँक यू बेबी फॉर धिस बेबी," असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे."


अर्जुन रामपालने मागील वर्षी मे महिन्यात पत्नी मेहर जेसियासोबतचा 20 वर्षांचा संसार मोडून घटस्फोट घेतला होता. मात्र मुलींसोबतचं त्याचं नातं आजही तेवढंच चांगलं आहे. अर्जुनला माहिका (वय 16 वर्ष) आणि मायरा (वय 13 वर्ष) या दोन मुली आहेत. त्याच्या दोन्ही मुली कायमच मीडिया आणि लाईमलाईटपासून दूर राहतात.