Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टचे एकापेक्षा एक हिट चित्रपट रिलीज होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. आलियाने गंगूबाई काठियावाडीतील तिच्या उत्कृष्ट भूमिकेमुळे चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आलियाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु, आलियाने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपर डुपर हिट चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत. हे चित्रपट नंतर प्रचंड हिट ठरले आहेत.  






नीरजा
आलिया भट्टला यापूर्वी सोनम कपूरचा सुपरहिट चित्रपट नीरजा ऑफर करण्यात आला होता. परंतु काही कारणांमुळे आलिया भट्ट या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही.


गोलमाल अगेन
रोहित शेट्टी स्टारर 'गोलमाल अगेन'ची ऑफर आधी आलियाकडे गेली होती. परंतु, तारखांचे नियोजन न झाल्यामुळे ही भूमिका परिणीती चोप्राने साकारली.  


राबता
चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसोबत आलिया भट्टची जोडी पाहायची होती. क्रितीच्या आधी आलिया भट्टला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. परंतु, तीने ती नाकारली. 


गंगुबाई काठियावाडी
संजय लीला भन्साळी यांना पहिल्यांदा राणी मुखर्जी किंवा प्रियंका चोप्राला गंगूबाईच्या भूमिकेत पाहायचे होते. परंतु, आलिया भट्टने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकून दाखवून दिले की ही भूमिका तिच्यापेक्षा चांगली कोणीच साकारू शकत नाही.


महत्वाच्या बातम्या