Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सिझलिंग लूकमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. याबरोबरच मलायका तिच्या वैयक्तिक लाईफबद्दलही अनेकदा चर्चेत असते. 2017 मध्ये मलायका आणि अरबाज खान यांच्यात घटस्फोट झाला. मलायका आणि अरबाजच्या प्रेमविवाहापूर्वी संपूर्ण इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती. परंतु, दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटानंतर आता एक जुनी मुलाखत समोर आली आहे. यामध्ये मलायकाने अरबाजसोबत लग्न का केले हे तिने स्वतः सांगितले आहे.


साजिद खानच्या चॅट शोमध्ये अभिनेता अनिल कपूर, अर्जुन रामपाल, मलायका अरोरा आणि अरबाज खान हे पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. शोमध्ये अनिल कपूरने मलायका अरोराला विचारले, की सलमान खान आणि अरबाज खान यांच्यामध्ये कोण जास्त सुंदर दिसते. या प्रश्नावर मलायका अरोरा म्हणते की, 'माझा नवरा अरबाज खान दिसायला चांगला आहे यात शंका नाही. याच कारणामुळे मी त्याच्याशी लग्न केले आहे. 


"अरबाजला गंभीर स्वभावाचे लोक आवडतात. शिवाय तो खूप रोमँटिक आहे. तो अनेकदा म्हणतो की, आम्ही एकत्र वृद्ध होत आहोत. मलाही त्याच्यासोबत स्वत:ला म्हातारे होताना बघायला आवडेल. हेच आमच्या प्रेमाचं कारण आहे, असे मलायकाने सांगितले. 


मलायकाने नुकतेच तिच्या घटस्फोटाबद्दल बोलताना सांगितले की, "एकटे राहणे कोणासाठीही सोपे नसते. तसेच ते माझ्यासाठीही सोपे नव्हते. घटस्फोट घेतल्यानंतर मी सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मला सर्वात जास्त भीती आणि कमजोरी जाणवली."


महत्वाच्या बातम्या