एक्स्प्लोर

बर्थ डे स्पेशल : ‘मेलोडी क्वीन’ आशाताईंबाबत 25 रंजक गोष्टी

आपल्या सुरांनी जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांचा आज 85 व्या वाढदिवस आहे.

मुंबई : गेली अनेक वर्षे सुरेल आवाजाने कानसेनांना आनंद देणारी आणि शास्त्रीय तसंच पाश्चिमात्य शैलीची गाणी लिलया गाणारी ‘मेलोडी क्वीन’चा आज वाढदिवस आहे. आपल्या सुरांनी जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांचा आज 85 व्या वाढदिवस आहे. याचनिमित्ताने आशा भोसले यांच्याशी संबंधित 25 रंजक गोष्टी 1) 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या ‘मेलोडी क्वीन’ अर्थात आशा भोसले यांनी 1943 मध्ये कारकीर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचं गायन सुरुच आहे. 2) 1948 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चुनरिया’ या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये गायला सुरुवात केली. संगीतकार हंसराज बहल यांनी ‘सावन आया’ गाण्यासाठी आशाबाईंना संधी दिली होती. 3) आशा भोसले यांनी मराठी, हिंदीसह 20 भाषांमधून गाणी गायली आहेत. 4) तर आपण 12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायल्याचं आशाबाईंनी 2006 मध्ये सांगितलं होतं. 5) गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनुसार आशा भोसले यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत. 6) भारत सरकाराने या महान गायिकेचा दादासाहेब फाळके आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान केला आहे. 7) आशा भोसले यांनी फक्त गायनातच नाही तर अभिनयातही झलक दाखवली. त्यांनी ‘माई’ चित्रपटात अभिनय केला होता आणि त्यांची कौतुकही झालं होतं. 8) आशा भोसलेंच्या करिअरच्या सुरुवातीला गीता बाली, शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांसारख्या मोठ्या गायिका आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टी गाजवत होत्या. त्यामुळे या तिघींनी नाकारलेली गाणीच आशाताईंच्या वाट्यात येत असत. 9) आशाताईंना दुसऱ्या दर्जांच्या सिनेमांची गायिका समजलं जात असे. विशेषत: खलनायिका किंवा सहअभिनेत्रींवर चित्रीत केलेली गाणीच त्यांना मिळत असत. 10) आशाताईंनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्नाची गाठ बांधली होती. 11) गणपतराव हे लता मंगेशकर यांचे पर्सनल सेक्रेटरी होते. त्यामुळे लता मंगेशकरांसह त्यांचं कुटुंब या लग्नाच्याविरोधात होते. पण आशाताई विरोधासमोर झुकल्या नाहीत. यामुळे लतादीदी आणि आशाताई यांच्या संबंधात कटुता आली आणि अनेक वर्ष त्यांच्यात अबोला होता. 12) गणपतराव आणि आशाताई यांना तीन मुलं झाली. सर्वात मोठ्या मुलाचं नाव हेमंत असून तो पायलट होता. त्यानंतर त्याने संगीतकार म्हणून काही चित्रपट केले. मुलगी वर्षा वृत्तपत्रांसाठी लेखन करत होती. तर सर्वात लहान मुलगा आनंदने बिझनेस आणि चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. आता तो आशाताईंचा व्यवसाय पाहतात. आशा भोसले यांची मुलगी वर्षाने वयाच्या 56 व्या वर्षी 2012 मध्ये आत्महत्या केली होती. 13) गणपतराव भोसलेंपासून वेगळं झाल्यानंतर आशाताईंनी महान संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांच्यासोबत संसार थाटला. आर डी बर्मन हे आशा भोसलेंपेक्षा सहा वर्षांनी लहान होते. तर आरडी यांचंही हे दुसरं लग्न होतं. 14) आशा भोसले उत्तम गायिका तर आहेतच सुगरणही आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज त्यांच्याकडे नेहमीच चिकन-मटण आणि बिर्याणी बनवून आणण्याची मागणी करत. 15) एका मुलाखतीत आशाताई म्हणाल्या होत्या की, जर गायिका म्हणून यशस्वी झाले नसते तर मी कूक नक्कीच झाले असते. 16) आशा भोसले यांचा रेस्टॉरंटचा बिझनेस जबरदस्त चालतो. दुबई आणि कुवेतमध्ये ‘आशाज’ नावाचे रेस्टॉरंट आहेत. इथे पारंपरिक उत्तर आणि पश्चिम भारतीय जेवण मिळतं. याशिवाय अबुधाबी, दोहा, बहरीनमध्येही त्यांचे रेस्टॉरंट आहेत. 17) रेस्टॉरंटची सजावट आणि तिथल्या जेवणाकडे आशाताईंचं विशेष लक्ष असतं. तिथल्या शेफना त्यांनी सुमारे सहा महिन्यांचं ट्रेनिंग दिलं आहे 18) आंतरराष्ट्रीय स्तरावरील कूक रसेलं स्कॉट यांनी आशा ब्रॅण्डचे अधिकार ब्रिटनसाठी खरेदी केले आहेत. त्यांच्या प्लॅनिंगनुसार पाच वर्षांमध्ये ‘आशा’ नावाचे 40 रेस्टॉरंट उघडले जातील. 19) बालपणी आशा त्यांची मोठी बहिण लता मंगेशकर यांच्या अतिशय जवळ होत्या. लतादीदी आशा भोसलेंना शाळेत घेऊन जात असत. पण एकीच्या फीमध्ये दोघींना शिकवू शकत नसल्याचं शिक्षकाने सांगितलं आणि यामुळे लतादीदींनी शिक्षण सोडलं. 20) ब्रिटनच्या अल्टरनेटिक रॉक बॅण्डने ‘ब्रिमफुल ऑफ आशा’ 1997 मध्ये रिलीज केलं होतं. आशा भोसलेंना डेडीकेट केलेलं गाणं आंतरराष्ट्रीय स्तरावर हिट झालं होतं. 21) आशा भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांनी पुरस्कारावर नाव कोरलं. 1979 मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाताईंनी स्वत:चं नामांकन नाकारलं, कारण नव्या गायकांना संधी मिळावी. आशा यांना 2001 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. 22) अदनान सामी जेव्हा दहा वर्षांचे होते तेव्हा आशाताईंनी त्याला गाण्यात करिअर करण्याचा सल्ला दिला होता. 23) आशा भोसले एक महान गायिका तर आहेतच पण त्या उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्टही आहेत. त्या लता मंगेशकर आणि गुलाम अली यांच्या आवाजाची उत्तम नक्कल करतात. 24) आशा भोसले यांनी सुरुवातीला ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’ या गाण्यासाठी इन्कार केला होता. त्यांना वेस्टर्न पॅटर्नचं गाणं गाण्यासाठी कठीण वाटत होतं. 25) आशा भोसले या पहिल्याच अशा गायिका आहेत, ज्यांना उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या अलबमसाठी ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. संबंधित बातम्या मला विष पाजलं होतं, गानकोकिळेचा गौप्यस्फोट  'सुन रहा है ना तू' गाणाऱ्या अंध टुम्पाच्या पाठीवर हरिहरन यांचा हात  ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी  लतादीदींकडून बाबासाहेब पुरंदरेंना सोन्याचं वळं भेट 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget