पाटणा : आधार कार्ड, मतदान यादी आणि रेशन कार्डच्या बाबतीत अनेकवेळा आपल्याला गडबड पहायला मिळते. अनेकवेळा फिल्म स्टार्स आणि महत्वाच्या व्यक्तींच्या नावांचा मनरेगा यादीत किंवा सरकारी अनुदान मिळणाऱ्या यादीत समावेश झाल्याच्या घटना पहायला मिळतात. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडल्याचं समोर आलंय.


सनी झाली महाविद्यालयातील युवकाची आई


बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका युवकानं आपल्या महाविद्यालायाच्या फॉर्ममध्ये आई म्हणून चक्क अभिनेत्री सनी लिओचं नाव लिहिलं आहे. गंमत म्हणजे, या पठ्ठ्याने अभिनेता इम्रान हाशमी आपले वडील असल्याचंही त्या फॉर्ममध्ये नमूद केलंय. बीआरए बिहार विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्यानं सनी लिओनी आपली आई असल्याचं नमूद केलेला हा फॉर्म सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


कुंदन कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो धनराज महतो महाविद्यालयात शिकत आहे. कुंदन कुमारने आपला पत्ता मुझफ्फरपूर असा सांगितला आहे. महाविद्यालयाच्या फॉर्ममध्ये सनी लिओनी आणि इम्रान हाशमी यांचं नाव वाचून महाविद्यालयातील स्टाफही गोंधळात पडला. या विद्यार्थ्यानं असा खोडकरपणा जाणीवपूर्वक केला असल्याचं मत महाविद्यालयातील स्टाफच्या काही सदस्यांनी व्यक्त केलं आहे.


सनी लिओनीची प्रतिक्रिया


सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होत असताना यावर सनी लिओनीनं मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. एका ट्वीटमध्ये तिनं म्हटलंय की, "हा मुलगा कमाल आहे, एवढं मोठं स्वप्न, हा हा हा"





या मुद्द्यावरुन महाविद्यालयाचे रजिस्ट्रार राम कृष्णा ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, "या घटनेचा तपास सुरु आहे. त्यावर अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. प्रवेश पत्रावर नमूद करण्यात आलेल्या आधार नंबर आणि फोन नंबरच्या सहाय्याने संबंधित विद्यार्थ्याला शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे."


सनी लिओनीच्या बाबतीत या आधीही अनेक वेळा असा प्रकार घडला आहे. कोलकाताच्या आशुतोष महाविद्यालयाच्या मेरिट लिस्टमध्ये सनी लिओनीचं नाव प्रथम क्रमांकावर झळकलं होतं.


महत्वाच्या बातम्या: