Bigg Boss Marathi New Season Day 28 : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 5) यंदाचा सीझन खूपच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील गणित दिवसेंदिवस बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी'चा चौथा आठवडा खूपच धमाकेदार ठरला. घरातील सदस्यांमध्ये वाद, रडारडी, भांडणं, पाहायला मिळाली. बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांचं खूप कौतुक झालं, तर काहींना मात्र नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं. आठवडाभरात सदस्यांनी केलेल्या राड्यावर रितेश भाऊ आज भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहेत. 


भाऊच्या धक्क्यावर आज कुणाची बत्ती गुल होणार?


'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) या आठवड्यात नॉमिनेशनची चूल पेटली आणि हाऊसफूल एन्टरटेनमेंट झालं. कोणी कोणाला धूळ चारली तर कोणाची बत्ती गूल झाली. आता आठवड्याभरातील या सर्व गोष्टींवर चर्चा करुन रितेश भाऊ सदस्यांना जोरदार भाऊचा धक्का द्यायला आता सज्ज आहे.






'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात सत्याचा पंचनामा झाला, नॉमिनेशची चूल पेटली. अशा अनेक गोष्टींदरम्यान घरातील सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. काहींकडून गंभीर चूका झाल्या असून सदस्यांना रितेश भाऊ आता या चूका दाखवून देणार आहे.


नेटकऱ्यांना रितेश भाऊकडून अपेक्षा


भाऊच्या धक्क्याकडून बिग बॉस प्रेमींना खूप अपेक्षा आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट करत रितेश भाऊचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, "रितेश भाऊ आज जान्हवी आणि निक्कीला त्यांची काय लायकी आहे हे दाखवून द्या, सारखं दुसऱ्यांची लायकी काढत असते." दुसऱ्याने म्हटलं, "जान्हवी आठवडाभर बोलते आणि शनिवार, रविवार आला की मुद्दाम शांत होते".


छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! 


लहान मुलं, महिलावर्ग ते आबाल वृद्ध अशा सर्वांनाच 'बिग बॉस मराठी'ने वेड लावलं आहे. 'बिग बॉस मराठी'ची आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. रितेशच्या 'भाऊच्या धक्क्या'ने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. 'बिग बॉस मराठी' या लोकप्रिय रिॲलिटी शोच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला 3.7 रेटिंग मिळाले असून रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला 4.0 रेटिंग मिळाले आहे. एकंदरीतच 'भाऊच्या धक्क्याला' 3.9 एव्हरेज रेटिंग मिळाले आहे. 'बिग बॉस मराठी'ने संपूर्ण आठवडा गाजवला आहे. खरंतर 'बिग बॉस मराठी'ने स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत 'बिग बॉस मराठी'ने इतिहास रचला आहे.


'बिग बॉस मराठी'ने रचला नवा विक्रम


'बिग बॉस मराठी'चं बिगुल वाजलं आणि नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील घराघरांत रात्री 9 च्या ठोक्याला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पाहिला जातो. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते कार्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वत्र 'बिग बॉस मराठी'बद्दल चर्चा होताना दिसून येते. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनसोबत नवी पिढी जोडली जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : निक्कीनं जेवणाच्या ताटाला मारली लाथ, नेटकऱ्यांचा संताप अनावर; म्हणाले, "अरे त्या निक्कीला बाहेर काढा"