Akshay Kumar Wear Sanitary Pads : बॉलिवूडचा 'खिलाडी' अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) त्याच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखला जातो. तो वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना हात घालत ते मोठ्या पडद्यावर मांडताना पाहायला मिळतो. अक्षय कुमार प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देतो. यासाठी तो त्याच्या भूमिकेवर विविध प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. अक्षयने अनेक बायोपिकमध्ये काम केलं आहे, याशिवाय तो ॲक्शन आणि कॉमेडी चित्रपटातही झळकला आहे. 


या चित्रपटाच्या शूटींगवेळी अक्षय कुमार वापरायचा सॅनिटरी पॅड


अक्षय कुमार खरोखर 'बॉलिवूडचा खिलाडी' असून एक पूर्ण पॅकेज आहे. अक्षय कुमार वेगवेगळ्या  धाटणीचा अभिनय करू शकतो. त्या भूमिकांसाठी तो विशेष मेहनतही घेतो. चित्रपटातील त्याचं पात्र साकरण्यासाठी तो त्याला समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि यासाठी तो वेगवेगळे प्रयोग करतो. अभिनेता अक्षय कुमार नेहमी त्याच्या एक्सपेरिमेंट्ससाठी ओळखला जातो, तो एका चित्रपटाच्या शूटींगवेळी सॅनिटरी पॅड वापरायचा. याचा खुलासाही त्याने स्वत: केला होता.


खिलाडी कुमारने स्वत: केला होता खुलासा


2018 मध्ये अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शुटींगबद्दलचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला होता, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पॅडमॅन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार गुलाबी रंगाची पँटी आणि सॅनिटरी पॅड वापरायचा. त्यानंतर त्याने आपला अनुभवही शेअर केला होता.


अक्षय कुमारचा पॅडमॅन खऱ्या व्यक्तीच्या जीवनापासून प्रेरणा घेतलेला चित्रपट होता. पॅडमॅन चित्रपट अरुणाचलम मुरुगनंतम यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होता. त्यांनी कमी खर्चात सॅनिटरी पॅड बनवण्याऱ्या मशीनचा शोध लावला होता. त्यांनी बनवलेल्या मशिनमधून कमी खर्चात सॅनिटरी पॅड बनवले जात होते. त्यांच्या या कार्यासाठी सरकारकडून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.






अक्षय कुमार पॅड वापरायचा


अक्षय कुमारने पॅडमॅन चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सांगितलं होतं की, चित्रपटाच्या शूटींहवेळी त्याने सॅनिटरी पॅड्स घातले होते, कारण त्याला याबद्दल काहीच माहिती नव्हती. अक्षय म्हणाला होता की, सॅनिटरी नॅपकिन गैरसोयीचे होतं की नाही हे मलाही माहीत नाही, पण एक माणूस म्हणून हे कोणीही करू शकणार नाही. मी पहिले 30 सेकंद घाबरलो होतो.


"एक अभिनेता म्हणून मी हे नक्कीच करेन"


पॅडमॅन चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आर बाल्की यांनी सांगितलं होतं की, अक्षय कुमारने हा खूप सुंदर अनुभव असल्याचं सांगितलं, "कारण ही अशी गोष्ट आहे, जी कदाचित मी माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच करणार नाही, पण एक अभिनेता म्हणून मी हे नक्कीच करेन", असं त्यावेळी अक्षय कुमार म्हणाला होता.