Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हे पर्व संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता फिनालेआधी या पर्वाचा विजेता कोण होणार हे समोर आलं आहे.


'बिग बॉस 17'चा विजेता कोण होणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. विजेत्याच्या नावावरुन अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. दरम्यान सोशल मीडियावर विजेत्याचं नाव लीक झालं आहे. नेटकरी विजेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


'बिग बॉस 17'चा विजेता कोण होणार? (Bigg Boss 17 Winner)  


'बिग बॉस 17'या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. या कार्यक्रमातील सर्वच स्पर्धक उत्तम खेळत आहेत. 'बिग बॉस 17'ची ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. पण या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे 'बिग बॉस'प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. 'बिग बॉस'च्या फॅन पेज खबरीने ट्वीट केल्यानुसार, अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), विकी जैन (Vicky Jain) मनारा चोप्रा (Mannara Chopra) 'बिग बॉस 17'चे विजेते होणार नसून मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) या कार्यक्रमाचा विजेता होईल.






'बिग बॉस 17'च्या विजेत्यासंदर्भात अनेक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात मिळालेल्या माहितीनुसार 28 जानेवारी 2024 रोजी मुनव्वर फारुकी 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर नाव कोरेल, असं लिहिलेलं दिसत आहे". मुनव्वर विजेता असल्याचे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर विनोदवीराच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.  


'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले कधी होणार? (Bigg Boss 17 Grand Finale Details)


व्हायरल ट्वीटमध्ये किती सत्य हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले 28 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. सध्या या कार्यक्रमात 'फॅमिली वीक' सुरू आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) आणि विकी जैनची (Vicky Jain) आई आलेली दिसून आली आहे. मुनव्वरची बहीनदेखील लवकरच येणार आहे. अरुन माशेट्टीची पत्नीदेखील त्याला पाठिंबा देण्यासाठी येणार आहे.


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : सलमान अन् तब्बूने सांगितला लग्नाचा प्लॅन; भाईजान म्हणाला, "व्हिलचेअरवर बसून घेणार सात फेरे"