Ajay Devgn : बॉलिवूडचा अॅक्शन स्टार अजय देवगन (Ajay Devgn) सध्या 'रेड 2' (Raid 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता या सिनेमात मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. या सिनेमात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.


'रेड 2'ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. पहिलं पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. 'रेड 2' या सिनेमात अजय देवगनसोबत वाणी कपूर (Vaani Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे या सिनेमातील खलनायकाच्या नावावरही शिक्कामोर्तब झालं आहे.


अजय देवगनचा 'रेड' हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून चाहते या सिनेमाच्या सीक्वेलची प्रतीक्षा करत होते. 'रेड 2' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अजय देवगन सज्ज आहे. 


अजय देवगनच्या 'रेड 2'मध्ये रितेश देशमुख दिसणार खलनायकाच्या भूमिकेत


'रेड 2' हा सिनेमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात खलनायकाची भूमिका कोण साकारणार हे आता समोर आलं आहे. 'रेड 2'मध्ये रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे रिलेशला खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


'रेड 2'च्या शूटिंगला सुरुवात


अजय देवगनच्या 'रेड 2' या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. मुंबईतील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिनेमाचं शूटिंग पूर्ण होणार आहे. राजकुमार गुप्ता (Rajkumar Gupta) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. टी-सीरिजच्या बॅनरअंतर्गत कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक या सिनेमाची निर्मिती करत आहेत. पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भागदेखील प्रेक्षकांना आवडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


'रेड 2' कधी रिलीज होणार? (Raid 2 Release Date)


अभिषेकने 'रेड 2'चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"आणखी एक केस सोडवण्यासाठी आयआरएस ऑफिसर अमय पटनायक परतला आहे. 15 नोव्हेंबर 2024 रोजी नाट्य आणि रहस्य पाहायला सज्ज व्हा". त्यामुळे 'रेड 2' हा सिनेमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार हे स्पष्ट होत आहे.


संबंधित बातम्या


Ajay Devgn : ना खाली हाथ आये थे, ना खाली हात जाएंगे; आणखी एक केस सोडवण्यास अमय पटनायक सज्ज