Randeep Hooda Lin Laishram Wedding : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत (Lin Laishram) लग्नबंधनात अडकला आहे. मणिपूरमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मणिपूरमध्ये पारंपारिक पद्धतीत ते लग्नबंधनात अडकले आहेत.
रणदीप-लिनच्या वेडिंग आऊटफिटने वेधलं लक्ष
रणदीप-लिनच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नात रणदीपने पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता परिधान केला होता. तर लिन मणिपूर स्टाईल आऊटफिटमध्ये दिसून आली. लिनचा आऊटफिट खूपच हेवी होता.
रणदीप हुड्डाने शेअर केले लग्नसोहळ्यातील फोटो (Randeep Hooda Wedding Photo)
रणदीप हुड्डाने लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"फॉर्म टूडे..व्ही आर वन". या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स केल्या आहेत. रणदीप आणि लिनच्या लग्नसोहळ्यातील फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
रणदीप-लिनची फिल्मी लव्हस्टोरी (Randeep Hooda Lin Laishram Lovestory)
रणदीप हुड्डा लिनसोबतच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाला,"आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नसीरुद्दीन शाह यांच्या 'मोटली' या नाटकाच्या ग्रुपमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. मी तिचा सीनियर होतो. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही संसार थाटण्याचा निर्णय घेतला".
मुंबईत होणार रिसेप्शन
रणदीप-लिनच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडकर उपस्थित नव्हते. मणिपूरमध्ये कुटुंबिय आणि मित्र-मंडळींच्या उपस्थित त्यांचा लग्नसोहळा पार पडला. आता मुंबईत त्यांच्या ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. या रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतील.
रणदीपची पत्नी लिन ही लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ओम शांती ओम, जाने जान, रंगून, मटरू की बिजली का मंडोली, हॅट्रिक सारख्या अनेक सिनेमांत तिने काम केलं आहे.
लिनआधी रणदीपचं नाव सुष्मितासोबत जोडलं गेलं होतं. 2004 ते 2006 मध्ये ते रिलेशनमध्ये होते. सुष्मितानंतर त्याचं नाव नीतू चंद्रा आणि आदिती राव हैदरीसोबतही जोडलं गेलं होतं.
संबंधित बातम्या