Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) घरात स्पर्धक प्रेग्नंट असल्याची चर्चा पहिल्यांदाच रंगली. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली होती. पण नंतर तिचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याचं समोर आलं. आता 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेल्या जिग्ना वोराने (Jigna Vora) अंकिताच्या प्रेग्नंसीचं सत्य सांगितलं आहे.


'बिग बॉस 17'च्या एका भागात अंकिताने विकीला ती प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. तसेच आपली प्रेग्नंसी टेस्ट झाली असून आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होत  असल्याचंही तिने सांगितलं होतं. पण नंतर तिचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याचं समोर आलं. या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर नावेद सोल म्हणाला की,"योग्य दिशेने गोष्टी होत आहेत". पण आता जिग्ना वोरा या कार्यक्रमातून बाहेर पडली असून तिने यासंदर्भात भाष्य केलं आहे". 


'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताची स्ट्रॅटर्जी लक्षात आली : जिग्ना वोरा


'बिग बॉस 17' या घरातून बाहेर पडल्यानंतर फिल्मीबीटला दिलेल्या मुलाखतीत जिग्ना वोरा म्हणाली,"अंकिताच्या प्रेग्नंसीची गोष्ट मी आणि रिंकूने खूप गंभीरपणे घेतली होती. आई असल्यामुळे प्रेग्नंसीमध्ये आंबड पदार्थ खाण्याचं मन होणं आणि ते खाणं गरजेचं आहे, असं मला वाटत नाही. हे फक्त हिंदी सिनेमांत पाहायला मिळतं. पण आता 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर ही स्ट्रॅटर्जी असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे". 


जिग्ना वोरा म्हणाल्या,"बिग बॉस 17'च्या घरात सहभागी होण्याआधी सर्व स्पर्धकांची ब्लड टेस्ट झाली होती. त्यामुळे अंकिता जर प्रेग्नंट असती तर ही बाब आधीच लक्षात आली असती. अंकिताने चर्चेत राहण्यासाठी प्रेग्नंसीचं खोटं नाटक केलं आहे". 


अंकिताचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अंकिताने रिंकू आणि जिग्नाला तिला आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होत असल्याचं सांगितलं होतं. तसेच मळमळ होत असल्याचंही ती म्हणाली होती. अंकिताच्या या बोलण्यावर रिंकू आणि जिग्नाने तिला चिडवलं होतं. त्यानंतर अभिनेत्री विकीसोबत प्रेग्नंसीबाबत बोलताना दिसून आली होती. विकीला तिने पाळी न आल्याचं आणि प्रेग्नंसी टेस्ट झाल्याचं सांगितलं होतं". अंकिताच्या या व्हिडीओनंतर तिच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरू झाली.


ऐश्वर्याने नीलला दिला खास सल्ला


'बिग बॉस 17'  या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्वच स्पर्धक एका पेक्षा एक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भागात ऐश्वर्या नीलला सांगते की,"शांत राहायला शिक...भांडण करण्याआधी जरा विचार करत जा... अंकिता आणि खानजादी दोघी मुली मिळून कधीही गेम करू शकतात. तू काही चुकीचं केलं नाही हे मला माहिती आहे. पण तुझं सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. कोणासोबत किती अंतर ठेवायचं हे तू ठरव". 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेने विकी जैनला दिली घर सोडण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?