मुंबई: बिग बॉस 14 च्या ग्रॅन्ड फिनालेला आजपासून सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या या घरात आता केवळ रुबीना दिलाइक, राहुल वैद्य, अली गोनी, निक्की तंबोली आणि राखी सावंत हे पाच कन्टेस्टंट्स राहिले आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीला विजयी करण्यासाठी वूट अॅप किंवा वेबसाइटच्या आणि माय जियो या अॅपच्या माध्यमातून व्होटिंग करु शकता. ही व्होटिंग लाईन रविवार दुपारी 12 पर्यंत सुरु राहणार आहे.


बिग बॉसचा 14 वा सीजन आतापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. सुरुवातीला काहीसा रटाळवाणा असलेल्या या कार्यक्रमाने नंतर वेग पकडला. बिग बॉसचा ग्रॅण्ड फिनाले 21 फेब्रुवारीला होणार आहे. या शोचा विजेता कोण असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.


आपल्या आवडत्या व्यक्तीला मतदान कसे कराल?
1) वूट अॅप किंवा वेबसाइट
बिग बॉसच्या 14 व्या सीजनच्या विजेत्याला व्होटिंग करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरुन वूट अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यामध्ये साईन इन करण्यासाठी त्याला फेसबुक किंवा गूगल अकाउंटशी लिंक करावं लागेल. त्यानंतर बिग बॉसच्या 14 व्या बॅनरवर क्लिक करा आणि फन झोन:व्होट, प्ले अॅन्ड विन वर जावं लागेल.


BIGG BOSS 14: विकेंड वॉरमध्ये सलमान चिडला! रुबीना दिलैक, अभिनव शुक्ला अन् कविता कौशिक यांची फेस टू फेस टक्कर


त्यानंतर एक व्होट नाऊ चा पर्याय दिसेल. त्यामध्ये सर्व फायनलिस्ट कन्टेस्टंट्सची नावे दिसतील. त्यानंतर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला व्होट करु शकता. वूटच्या वेबसाईटवरही अशीच प्रक्रिया आहे.


2) माय जियो अॅप
माय जियो अॅपच्या माध्यमातूनही आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला व्होट करु शकता. हे अॅप ओपन केल्यानंतर जियो इंगेज आणि त्यानंतर बिग बॉस वर क्लिक करा. त्यानंतर व्होटिंगच्या पर्यायावर क्लिक करुन आपल्या आवडत्या व्यक्तीला व्होट करु शकता.


बिग बॉस 14 ग्रॅन्ड फिनाले तारीख आणि व्होटिंग वेळ
बिग बॉस 14 ग्रॅन्ड फिनाले रविवारी 21 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता होणार आहे. त्यासाठी व्होटिंगसाठी रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत व्होटिंग लाईन सुरु राहतील.


आईने काय शिकवण दिली माहिती नाही, पण बाप म्हणून माफी मागतो; जानच्या चुकीसाठी कुमार सानूंचा माफीनामा