Mili, Koshish And Bawarchi Remake: जादुगर फिल्म्सचे अनुश्री मेहता आणि अबीर सेनगुप्ता,  SRS प्रॉडक्शनचे समीर राज सिप्पी (Sameer Raj Sippy) यांनी मिली (Mili), कोशिश (Koshish) आणि बावर्ची (Bawarchi) या तीन आयकॉनिक हिंदी चित्रपटांच्या रिमेकची घोषणा केली आहे.


मिली, कोशिश, बावर्ची हे तिन्ही चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट मानले जातात. कोशिश ही एक हृदयस्पर्शी कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांनी केले. बावर्ची आणि मिली हे ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित क्लासिक चित्रपट आहेत. प्रेक्षकांना आजही हे चित्रपट बघायला आवडतात. या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), जया बच्चन (Jaya Bachchan), राजेश खन्ना (Rajesh Khanna), संजीव कुमार (Sanjeev Kumar) या कलाकारांनी काम केलं.


जादुगर फिल्म्सचे अनुश्री मेहता आणि अबीर सेनगुप्ता यांनी सांगितलं, 'या तीन आवडत्या चित्रपटांची नव्या रूपात आणि फॉर्मेटमध्ये पुन्हा कल्पना करण्याच्या या जादुई प्रवासाला सुरुवात करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे चित्रपट रिक्रिएट करणं  ही एक मोठी जबाबदारी आहे.  कारण या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. हे चित्रपट गुलजार साहाब आणि ऋषी दा यांनी बनवले आहेत. या चित्रपटांनी एक आदर्श निर्माण केला आहे. हे असे चित्रपट आहेत जे पाहत आपण मोठे झालो आहोत आणि नव्या पिढीनेही पाहावे अशा या कथा आहेत.  दूरदूरच्या प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणाऱ्या या चित्रपटांचा रिमेक करण्याचा आमचा प्रयत्न असेल.'


समीर राज सिप्पी म्हणाले, "मला वाटते की या कथा प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासारख्या आहेत. म्हणूनच मला वाटते की आपण क्लासिक कथा पुन्हा नव्या आणि आधुनिक स्वरूपात लोकांसमोर आणल्या पाहिजेत. चित्रपटाच्या कलाकारांची आणि क्रूची घोषणा अद्याप झालेली नाही. समीर राज सिप्पी हे एन.सी. सिप्पी यांचे नातू आणि राज सिप्पी यांचे पुत्र आहेत.


 मिली हा चित्रपट 1975 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तर  कोशिश  हा चित्रपट 1972 मध्ये रिलीज झाला होता. त्याचबरोबर 1972 मध्ये बावर्ची हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता या तिन्ही आयकॉनिक चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


10 Years Of Bhaag Milkha Bhaag: 'भाग मिल्खा भाग'ला दहा वर्ष पूर्ण; फरहान अख्तरनं व्यक्त केल्या भावना, म्हणाला, 'माझ्या करिअरमधील आणि आयुष्यातील...'