10 Years Of Bhaag Milkha Bhaag: कष्ट, जिद्द आणि चिकाटी या सर्व गोष्टी जर आयुष्यात असतील तर कोणतेही अवघड काम माणूस करु शकतो ही शिकवण देणारा भाग मिल्खा भाग (Bhaag Milkha Bhaag) हा चित्रपट रिलीज होऊन आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तरनं मिल्खा सिंह यांची भूमिका साकारली आहे. आज या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि चित्रपटामधील इतर कलाकरांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
फरहान अख्तरची पोस्ट
फरहान अख्तरनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'माझ्या करिअरमधील आणि माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा असलेला चित्रपट प्रदर्शित होऊन आज 10 वर्षे झाली आहेत. माझ्या हृदयात या चित्रपटाला विशेष स्थान आहे. तुमच्या प्रेमाने हे शक्य झाले. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.. आणि मला या चित्रपटाचा एक भाग होऊ देण्यासाठी राकेशजींचे मी मनापासून आभार मानतो'
दिव्या दत्ताची पोस्ट
दिव्या दत्तानं सोशल मीडियावर भाग मिल्खा भाग या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,' काही चित्रपट हे एखाद्या जादूप्रमाणे असतात. भाग मिल्खा भाग हा चित्रपट त्याच चित्रपटांपैकी एक आहे.या चित्रपटातील प्रत्येक क्षणामधून मी खूप काही शिकले.या चित्रपटाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे.'
राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट दिवंगत स्पोर्टिंग आयकॉन मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात फरहान अख्तरसोबतच सोनम कपूर आहुजा, दिव्या दत्ता, पवन मल्होत्रा, योगराज सिंग आणि प्रकाश राज यांनी देखील विशेष भूमिका साकारली.
मिल्खा सिंह यांनी 2021 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक पिढ्यांना त्यांच्या कामगिरीने प्रेरित केले. मिल्खा सिंह यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले