एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘बाबूमोशाय बंदूकबाज’मधील इंटिमेट सीनवर अखेर बिदिताने मौन सोडलं!
‘बाबूमोशाय बंदूकबाज’ सिनेमाची स्क्रीप्ट वाचल्यानंतरच यात काम करण्याचा निर्णय घेतल्याचं बिदिता सांगते.

मुंबई : ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ सिनेमातील आपल्या लूक आणि हॉट अवतारामुळे अभिनेत्री बिदिता बाग चर्चेत आली आहे. या उलट-सुलट चर्चांवर आतापर्यंत तिने मौन बाळगलं होतं. मात्र, अखेर तिने सिनेमातील इंटिमेट सीन्सवर आपलं मत मांडलं आहे.
‘बाबूमोशाय बंदूकबाज’ सिनेमाची स्क्रीप्ट वाचल्यानंतरच यात काम करण्याचा निर्णय घेतल्याचं बिदिता सांगते. विशेष म्हणजे या सिनेमातील इंटिमेट सीन शूट होईपर्यंत बिदिता आणि नवाजुद्दीन सिद्दिकी एकमेकांना नीट ओळखतही नव्हते.
इंटिमेट सीनमुळे चित्रांगदा सिंहने सिनेमाला राम राम केल्याच्या चर्चांवर बोलताना बिदिता म्हणाली, या सिनेमाची स्क्रीप्ट वाचल्यानंतर कुणी सिनेमा न करण्याचा विचारही करु शकत नाही.
याच सिनेमाबाबत बोलताना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी म्हणाला, भारतीय संस्कृती 5 हजार वर्षे जुनी आहे आणि त्यात कुठेही सेक्स या विषयाला टॅबू मानलं गेलं नाही. कालिदास यांसारख्यांनी ज्याप्रकारे प्रेमाची परिभाषा सांगितलीय, तसं आजचे कुणीही लेखक करु शकत नाही.
सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेबाबत नवाजुद्दीनला विचारल्यास तो म्हणाला, सध्या इंटरनेटचं युग आहे आणि आजच्या घडीला सर्वकाही प्रेक्षकांच्या हातात आहे. सिनेमातील कोणत्याही सीनवर कट मारणं हास्यास्पद ठरेल.
ट्रेलर पाहा :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
