Kangana Ranaut tweet On India Vs Bharat Controversy : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या अभिनयासह वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता जी-20 (G-20) निमंत्रण पत्रिकेवरुन कंगना रनौतने ट्वीट केलं आहे. "आपण भारतीय आहोत...इंडियन नाही", असं म्हणत अभिनेत्रीने ट्वीट केलं आहे. 


कंगना रनौतचं ट्वीट काय? (Kangana Ranaut Tweet)


कंगनाने ट्वीट करत लिहिलं आहे,"इंडिया' या नावात प्रेम करण्यासारखं काय आहे? ब्रिटिशांना  'सिंधू' उच्चारता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ते नाव बदलून 'इंड्स' केलं. त्यांनी काहींनी हिंदोस तर काहींनी इंदोस म्हटलं. अखेर शेवटी ते इंडिया म्हणायला लागले. महाभारताच्या काळापासून कुरुक्षेत्राच्या महायुद्धात सहभागी झालेली सर्व राज्ये भारत नावाच्या एका खंडाखाली आली मग ते आपल्याला इंदू सिंधू का म्हणत होते?". 






कंगनाने पुढे लिहिलं आहे,"भारत' हे नाव किती अर्थपूर्ण आहे. 'इंडिया' या शब्दाचा अर्थ काय? ब्रिटिश आपल्याला रेड इंडियन म्हणत असे. जुन्या इंग्रजी भाषेत 'इंडियन' या शब्दाचा अर्थ गुलाम म्हणून केलेला आहे. त्यामुळे ते भारतीयांना इंडियन म्हणू लागले. 'इंडियन' ही ब्रिटिशांनी भारताला दिलेली नवी ओळख आहे. जुन्या शब्दकोशातही 'इंडियन' या शब्दाचा अर्थ गुलाम असा आहे. 'इंडियन' हे आपलं ना नव्हे आपण भारतीय आहोत...इंडियन नाही". 


जी-20 डिनर निमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' (President Of India) ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' (President Of Bharat) असे लिहिल्यामुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील एक सूचक ट्वीट केलं होतं, त्यांनी लिहिलं होतं,"भारत माता की जय". तामिळ अभिनेता विष्णु विशालनेही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारत हा नेहमीच भारत होता.. आपण नेहमीच देशाला इंडिया आणि भारत या नावाने ओळखतो..मग आता हे का? मेरा भारत महान". क्रिकेटर वीरेंद्र सहवागनेही ट्वीट केलं आहे.


एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) म्हणाले,"भारताला 'भारत' म्हटले जात असेल तर ते चुकीचं नाही. नाव जरी बदललं तरी आम्ही बदलणार नाही". 






संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : भारत माता की जय! G-20 निमंत्रण पत्रिकेवरुन अमिताभ बच्चन यांचं सूचक ट्वीट