यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ 13 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याअगोदर डिस्ने + हॉटस्टारने नुकताच भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे, ज्यात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय वायुसेनेचे आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्या पराक्रमावर प्रेरीत भुज चित्रपट आहे.


या टीझरमध्ये थरारक घटनांचे सीक्वेन्स, भावनांच्या अनेक छटा, देशप्रेम आणि भुजमधील लोकांची एकता प्रतीत होत आहे. टीझरच्या शेवटी, अजय देवगण लढाईच्या पार्श्वभूमीवर जखमी अवस्थेत पुढे येतो तेव्हा "मै जीता हू मरने के लिए, मेरा नाम है सिपाई" असं देशप्रेमाने भारुन टाकणारं वाक्य ऐकू येतं. टी-सीरिज आणि अजय देवगण फिल्म्स प्रस्तुत, भुज: प्राइड ऑफ इंडियाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, गिन्नी खानुजा, वजीर सिंग आणि बनी संघवी यांनी केली आहे. अभिषेक दुधैया, रमण कुमार, रितेश शाह आणि पूजा भवोरिया यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.






सत्य घटनेवर आधारीत
हा चित्रपट 1971 च्या सत्य घटनेवर आधारित आहे. जेव्हा पाकिस्तानने भारताच्या एअरबेसवर हल्ला केला होता. एअरबेसवर 92 बॉम्ब आणि 22 रॉकेटने हल्ला करण्यात आला होता. अशा परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या शूर अधिकाऱ्याने आपल्या धैर्याने एअरबेस वाचवलाच. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नवीन हवाई पट्टी रात्रीत तयार केली. विजय कर्णिक असे अधिकाऱ्याचे नाव होते. अजय देवगण चित्रपटात तीच भूमिका साकारत आहेत.


सोनाक्षी गावची मुलगी तर नोरा दिसणार एजंटच्या भूमिकेत
या चित्रपटात प्रत्येक पात्राची भूमिका खूप रंजक आहे. विशेषत: सोनाक्षी सिन्हा आणि नोरा फतेही. नोरा या चित्रपटातून अभिनयाची कौशल्ये दाखवणार आहे, यात ती एजंटची भूमिका साकारणार असून कडक अ‍ॅक्शन करतानाही दिसणार आहे. दुसरीकडे, सोनाक्षी सिन्हा भुजमधील खेड्यातील एका मुलीच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर मोशन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही सांगण्यात आली आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी भुजला 13 ऑगस्ट रिलीज होणार आहे. आपण हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर पाहू शकता.