Baahubali: The Beginning : देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या 'बाहुबली: द बिगनिंग' या चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. बाहुबली चित्रपटानंतर भारतीय चित्रपटांची रुपरेषा बदलली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बाहुबलीच्या टीमनं शनिवारी सोशल मीडियावर ब्लॉकबस्टर फ्रेंचायजीची सहा वर्ष मोठ्या उत्साहात साजरी केली. बॉहुबलीची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास, देवसेना म्हणून झळकलेली अनुष्का शेट्टी, राणा दुग्गुबत्ती आणि तमन्ना भाटीया या स्टार्सनी इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिला. 



प्रभास... चित्रपटाच्या दोन्ही पार्टमधील मुख्य भूमिकेत असलेला बाहुबली. अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या आणि अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत अनेक आठवणी पुन्हा ताज्या केल्या. इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत "बाहुबलीची 6 वर्षे" असं कॅप्शन प्रभासनं दिलं आहे. 




राणा दग्गुबाती... ज्यानं चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारली होती. त्यानं एक फोटो शेअर करत "बाहुबलीची 6 वर्षे" असं कॅप्शन देत स्टोरीसह पोस्ट टाकली. अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटियाने प्रभासची पोस्ट रिपोस्ट केली. 


'बाहुबली' दोन भागांत रिलीज करण्यात आलेला चित्रपट, 'बाहुबली : द बिगनिंग' 2015 साली 10 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. तर याचा पुढचा पार्ट 'बाहुबली 2: द कन्क्लूजन' 28 एप्रिल, 2017 मध्ये रिलीज करण्यात आला होता. 


दरम्यान, बाहुबली चित्रपटानं भारतातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. अशाच या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेल्या प्रभास, अनुष्का शेट्टी आणि राणा दग्गुबाती यांना वेळगी ओळख मिळाली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :