Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमातील 'हम नशे में तो नही' (Hum Nashe Mein Toh Nahi) हे गाणं रिलीज झालं आहे.
कार्तिक-कियाराचा रोमॅंटिक अंदाज
'हम नशे में तो नही' या गाण्यात कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. तर अरिजीत सिंह आणि तुलसी कुमारने हे गाणं गायले आहे. तर विजय गांगुली यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. कार्तिक आणि कियाराचा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
'भूल भुलैया 2'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अनीस बज्मी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. कार्तिक, कियारा आणि तब्बू या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा 20 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'भूल भुलैया 2' हा 2007 साली प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या भूल भुलैया सिनेमाचा सिक्वेल आहे.
संबंधित बातम्या