Bhaubali : गेल्या काही दिवसांपासून अनेक दर्जेदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' (Bhaubali) हा एक धमाल विनोदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात विनोदवीरांची फौज असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे. 


प्रासंगिक विनोदावर आधारित 'बाहुबळी' या सिनेमाची खासियत म्हणजे 50 हून अधिक नामवंत कलाकारांची तगडी फौज या सिनेमाला लाभली असून प्रेक्षकांना विनोदाचा तुफान धमाका यात अनुभवायला मिळणार आहे. हा सिनेमा वास्तववादी असून या सिनेमाची निर्मिती नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांनी केली आहे. 






किशोर कदम, मनोज जोशी, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, रेशम टिपणीस, प्रियदर्शिनी इंदलकर, आशय कुलकर्णी, संतोष पवार, तुषार घाडीगावकर, शार्दूल सराफ, सचिन भिलारे, आनंद अलकुंटे, विश्वास सोहनी, रसिका आगाशे, विजय केंकरे, श्रीकर पित्रे असे चित्रपटसृष्टीतील कसलेले, लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना खदखदून हसवण्याकरता येणार असून आपल्या भन्नाट विनोदशैलीने प्रत्येक व्यक्तिरेखा काही नवीन शिकवण देऊन जाईल. 


दोन वेगळ्या जीवनशैलीचे लोक जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्यात होणारे मतभेद, कलह, संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारी सूड भावना या सिनेमात अगदी हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना  16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा खळखळून हसवण्यात यशस्वी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.


संबंधित बातम्या


Bhaubali : टेन्शनला मारा गोळी... मनोरंजनचा विस्फोट करायला येतायत 'भाऊबळी'; नवं पोस्टर आऊट


Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशचा बबली अंदाज; ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज