Bhakshak Teaser Out: अभिनेत्री भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar) ही त्याच्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. तिच्या थँक्यू फॉर कमिंग, दम लगाके हईशा या चित्रपटातील भूमिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता भूमि ही नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव 'भक्षक' (Bhakshak) असं आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये भूमि ही पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. 


सत्य समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रकाराची कहाणी! (Bhakshak Teaser Out)


'भक्षक' या चित्रपटात लहान मुलींना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी  धडपडणाऱ्या पत्रकाराची गोष्ट दाखवण्यात येणाक आहेय. टीझरमध्ये अभिनेत्री भूमि पेडणेकर ही वैशाली सिंगच्या भूमिकेत दिसत आहे. जी पत्रकार असते. वैशाली  ही महिलांवर होणारे अत्याचार जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असते.  "छोटी-छोटी बच्चियों के अधिकार के लिए लड़ रहे है हम" हा भूमिका डायलॉग टीझरमध्ये ऐकू येतो.


'भक्षक' मध्ये हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका


सत्य घटनांवरुन प्रेरित असणाऱ्या नेटफ्लिक्स इंडियाच्या भक्षक हा आगामी चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. हा पुलकित दिग्दर्शित आणि गौरी खान आणि गौरव वर्मा निर्मित क्राइम ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर, संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तव आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


पाहा टीझर






नेटफ्लिक्सनं भक्षक या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला त्यांनी कॅप्शन दिलं, "सत्य समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या एका पत्रकाराची कहाणी. 9 फेब्रुवारी रोजी येणार्‍या खर्‍या घटनांनी प्रेरित असणारा 'भक्षक' फक्त नेटफ्लिक्सवर." टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


भूमि पेडणेकरचा 'थँकू फॉर कमिंग' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटात शिबानी बेदी, डॉली सिंग, कुशा कपिला आणि शहनाज  यांनी काम केलं होतं.  भूमी 'तख्त', 'सारे जहाँ से अच्छा' आणि मेरी पत्नी का रीमेक या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असं म्हटलं जात आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bhumi Pednekar: वडील होते महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री; भूमीला पहिल्याच चित्रपटासाठी वाढवावं लागलं 12 किलो वजन, वैयक्तिक आयुष्यामुळे कायम असते चर्चेत