Raveena Tandon Prayers Somnath Jyotirling Temple : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची (Raveena Tondon) देवावर खूप श्रद्धा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने अनेकदा चाहत्यांना यासंदर्भात सांगितलं आहे. लेक राशा थदानीसोबत (Rasha Thadani) ती मंदिरात पूजा करतानाही दिसून येते. आता 'कर्मा कॉलिंग' (Karmma Calling) या वेबसीरिजच्या रिलीजआधी रवीनाने लेक राशासोबत सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे (Somnath Jyotirling) दर्शन घेतलं आहे.


रवीना टंडन सध्या 'करमा कॉलिंग' या आगामी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजच्या रिलीजआधी रवीनाने आपल्या लेकीसह सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. सीरिज यशस्वी व्हावी यासाठी तिने महादेवाकडे आशीर्वाद मागितले आहेत. रवीनाचा सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन (Raveena Tondon Prayers at Somnath Jyotirling Temple) घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


रवीना टंडनने शेअर केला व्हिडीओ (Raveena Tondon Shared Somnath jyotirling Temple Video)


रवीना टंडनने सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराची झलक पाहायला मिळत आहे. यावेळी रवीनाने खास साडी नेसली होती. तर लेक राशाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. कपाळावर भस्म, साडी आणि 'हर हर महादेव'च्या जयघोषात त्यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आहे.






रवीनाने व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे,"सोमनाथ! ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् || हर हर महादेव". मंदिरात फोटो किंवा व्हिडीओ शूट करायला बंदी आहे. त्यामुळे रवीनाने आधीच सांगितलं की,"सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या परवानगीने शूट केलं आहे". 


रवीनाचा 'कर्मा कॉलिंग' कधी रिलीज होणार? (Karmma Calling Release Date)


'कर्मा कॉलिंग' ही सीरिज गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 26 जानेवारी 2024 रोजी ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजसह रवीना 'वेलकम टू द जंगल' (Welcome to The Jungle) या सिनेमातही झळकणार आहे. अभिनेत्रीच्या आगामी कलाकृतींची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Raveena Tondon : रवीना टंडनच्या 'Karmma Calling'चा टीझर आऊट; दमदार भूमिकेत करणार ओटीटीवर पदार्पण