Saanand Verma : वयाच्या तेराव्या वर्षी लैंगिक शोषण, आजही 'त्या' घटनेच्या जखमा ओल्या; अभिनेत्याच्या मनावर बालवयातच झालेत मोठे घाव

Saanand Verma : या व्यक्तिरेखेतून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या सानंद वर्माने प्रत्यक्ष आयुष्यात दु:ख झेलले आहे. सानंदने एका मुलाखतीत आपल्या गतकाळातील दु:खद घटना सांगितल्या.

Continues below advertisement

Saanand Verma :  लहान वयात काहींना लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अनेकांनी आपल्या या भयावह भूतकाळाबद्दल जाहीरपणे सांगितले आहे. वयाच्या 13 व्या वर्षी लैंगिक शोषणाला (Sexual Abuse) सामोरे जावे लागले असल्याचे एका अभिनेत्याने सांगितले. त्या घटनेच्या जखमा आजही मनावर असल्याचे त्यांनी सांगितले. 

Continues below advertisement

'भाभीजी घर पर है' या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेत 'अनोखे लाल सक्सेना' ही व्यक्तीरेखादेखील चांगलीच लोकप्रिय झाली. या व्यक्तिरेखेतून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या सानंद वर्माने (Saanand Verma ) प्रत्यक्ष आयुष्यात दु:ख झेलले आहे. सानंदने एका मुलाखतीत आपल्या गतकाळातील दु:खद घटना सांगितल्या.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सानंदने आपल्यावरील प्रसंग सांगितला. क्रिकेट खेळण्यासाठी ज्या ठिकाणी जात असे, त्या ठिकाणी एका व्यक्तीने त्याचे लैंगिक शोषण केले असल्याचे सानंदने सांगितले. या घटनेने मनाला दिलेल्या जखमा आजही कायम असल्याचे त्याने म्हटले. 

सानंदने सांगितले दु:ख

सानंदने सांगितले की, क्रिकेटचा सामना खेळताना माझ्यासोबत एक घटना घडली. त्यावेळी मी 13 वर्षांचा होतो. मला क्रिकेटपटू व्हायचे होते. मी पाटणा क्रिकेट ट्रेनिंग अॅकेडमीत खेळण्यासाठी जात असे. त्या ठिकाणी वयाने मोठा असलेला एक मुलगा होता. तो माझे लैंगिक शोषण करत असे. या घटनेने मी खूपच घाबरलो आणि  त्या ठिकाणाहून पळून गेलो. त्यानंतर मी क्रिकेटपासून कायमचा दूर झालो असे सानंदने म्हटले. 

सानंदने पुढे सांगितले की, लहानपणी माझ्यासोबत जी घटना घडली ती एक भयंकर आठवण आहे. माझ्यासोबत याआधी काही दु:खद घटना घडल्या आहेत. एखाद्याने व्यक्तीने इतकं दु:ख सहन केल्यावर त्याला इतर दु:खांचे फार काही वाटत नाही. 

सानंद वर्मा हा मागील 10 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. त्याने सीआयडी, लापतागंज, गुपचूप सारख्या मालिकांमध्ये काम केले. त्याशिवाय रेड, मर्दानी, बबली, बाउन्सर, छिछोरे आणि मिशन रानीगंज सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

इतर संबंधित बातमी :

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola