Vaibhav Mangle In Hindi Language Compilation: यंदाचं शैक्षणिक वर्ष (Academic Year) सुरू झाल्यापासून राज्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. पहिलीपासून हिंदी सक्तीची (Hindi Language) करण्याचा जीआर राज्य सरकारनं (Maharashtra Government) तीव्र विरोधामुळे मागे घेतला होता. पण आता नवा जीआर काढलाय. त्यात हिंदी सक्तीची नसली तरी पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्यात आलंय. त्यामुळे राज्य सरकारनं मागच्या दारानं हिंदी सक्तीची केल्याचा आरोप केला जात आहे. याला राज्यभरातून विरोध केला जात आहे. तसेच, अनेक राजकीय पक्षांनी याविरोधात भूमिका जाहीर केली आहे. अशातच अनेक मराठी सेलिब्रिटी आणि अनेक राजकीय नेत्यांनी यावर वक्तव्य केलं आहे. अशातच मराठी रंगभूमी, मराठी सिनेविश्व आणि मराठी मालिका विश्वातील नावाजलेले अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे. याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वक्तव्य केलं आहे.
अभिनेते वैभव मांगले यांनी फेसबुकवर भलीमोठी पोस्ट करुन हिंदी भाषा सक्तीला विरोध दर्शवला आहे. तसेच, त्याबाबत सविस्तर उदाहरणं देत स्पष्टीकरणंही दिलं आहे. वैभव मांगले काय म्हणाले सविस्तर पाहुयात...
फेसबुक पोस्टमध्ये वैभव मांगले नेमकं काय म्हणाले?
मराठी अभिनेते वैभव मांगले म्हणाले की, "उर्वरीत महाराष्ट्रच मला माहीत नाही . पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे .. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलाव लागत हा एक भाग. दुसरं म्हणजे आपल्या आपल्यात सुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते. आप ली मुलं चांगल मराठी बोलायचं विसरून गेली आहेत. त्यात हिंदीची सक्ती केली तर संपलच सगळं मातृभाषेची (मुळात आई मराठी बोलत असले तर) भिकारणीची अवस्था होईल." आता तर खेडो पाडी इंग्रजी शाळा झाल्या आहेत . मुंबई पुणे येथे अनेक शाळा मध्ये मराठी शिकवीत नाहीत . मुलांशी घरात इंग्रजी बोला सांगतात. आई बाबा ला धड इंग्रजी येत नाही .. शाळेत शिक्षकांचं जे ऐकतील ते (शिक्षक तरी किती चांगलं बोलतील) त्यामुळे धड इंग्रजी नाही धड मराठी नाही .. त्यात बोली भाषा वेगवेगळ्या , पुन्हा शाळेत प्रमाण भाषा शिका . त्याचा वेगळा ताप . आई खिमट म्हणते आणि शाळेत मऊभात म्हणा म्हणतात... मी उबारलायस म्हणतो शाळेत उभा राहिला आहेस म्हणतात. माझ्या वांगडा चल म्हणतो तर शाळेत माझ्या बरोबर चल म्हणा म्हणतात. ही त्या बालमनाला संकट वाटतात. तर अजून हिंदी (राष्ट्रभाषा म्हणतात तिला) जोडीला आणून बसवली तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा.", असं वैभव मांगलेनं त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"आपण आपल्या भाषेची कमालीची भीषण अवस्था केली आहे .तिच्या बद्दल कमालीचा अनादर आहे. आम्हाला तर सिरियल ला स्क्रिप्ट सुद्धा मराठीत देत नाहीत (अनेक ठिकाणी) तर इतर ठिकाणी जिथे हिंदी भाषिक इंग्रजाळलेले लोक आपली काय पत्रास ठेवतात ते आपण पाहतो आहोत .हिंदी पहिली पासून येईल न येईल हा माझ्या साठीच नंतरचा मुद्दा आहे .. येणार ही नाही कदाचित पण म्हणून आपलं मराठी भाषेबद्दलच प्रेम वाढणार आहे का ?? आपण आपल्या मुलांच मराठी चांगलं होण्यासाठी अधिक सजग होणार आहोत का ? मुळात आपण मराठीत बोलणार आहोत का ????", असं वैभव मांगले म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :