Rajeshwari Kharat Video : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat Video) सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असते. त्यामुळे ती बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल देखील होते. तर काही वेळेस चाहत्यांकडून तिला चांगला प्रतिसाद देखील मिळतो. अभिनेत्री राजेश्वरी खरातने आता आलिया भटच्या गंगुबाई काठियावाडी सिनेमातील 'मेरी जान' या गाण्यावर खास रील शूट (Rajeshwari Kharat Video) केलंय. यावेळी तिने तिच्या सौंदर्याची झलक दाखवलेली पाहायला मिळत आहे. (Rajeshwari Kharat Video) हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
राजेश्वरी खरातचं सोशल मीडियावर धर्मावरुन ट्रोलिंग
अभिनेत्री राजेश्वरी खरात गेल्या काही आठवड्यांमध्ये धर्मावरुन ट्रोल झालेली पाहायला मिळाली. मात्र, मी कोणताही धर्म बदलेला नाही, मी ख्रिश्चन कुटुंबातचं जन्मले, असं स्पष्टीकरणही राजेश्वरी खरातने दिलं होतं. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने ट्रोलिंग करणाऱ्या लोकांना चांगलचं सुनावलं होतं. शिवाय, जब्या म्हणजे सोमनाथ अवघडे सोबत काही प्रोजेक्टवर काम सुरु असल्याचंही तिने सांगितलं होतं. मात्र, दोघांचं लग्न झालंय की नाही? हे पब्लिकला ठरवूद्या, मी याबाबत सध्या काही खुलासा करणार नाही, असंही ती म्हणाली होती.
राजेश्वरी खरातला आला होता वाईट अनुभव
दरम्यान, यावेळी अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने कास्टिंग काऊचा अनुभव देखील सांगितला होता. एका दिग्दर्शकाने कॉल करुन तिच्याकडे वाईट मागणी केली, असल्याचं राजेश्वरी म्हणाली होती. सिनेक्षेत्रात असे वाईट अनुभव येतील, याबाबतची कल्पना गार्गी ताईंनी दिली होती. लोक कुठंपर्यंत जाऊ शकतात आणि त्यांना समोरे जाण्यासाठी तू अगोदर स्ट्राँग पाहिजेस, असं त्यांनी मला सांगितल्याचं राजेश्वरी खरातने सांगितलं होतं. दरम्यान, राजेश्वरी खरात आता तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चत आली आहे. नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
