Bachchan Pandey Trailer : 'मुझे भाई नहीं गॉड फादर बोलते है' बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज; अक्षयचा हटके लूक
Bachchan Pandey Trailer : बच्चन पांडे (Bachchan Pandey) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
![Bachchan Pandey Trailer : 'मुझे भाई नहीं गॉड फादर बोलते है' बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज; अक्षयचा हटके लूक Bachchan Pandey Trailer Akshay Kumar kriti sanon Bachchhan Paandey Trailer Released Bachchan Pandey Trailer : 'मुझे भाई नहीं गॉड फादर बोलते है' बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज; अक्षयचा हटके लूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/6f4ae8fc51073bbd4311a65d1894ee17_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bachchan Pandey Trailer : बहुचर्चित चित्रपट बच्चन पांडेचा (Bachchan Pandey) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला पाहून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या ट्रेलरमधील अक्षय कुमारच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. चित्रपटात अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री कृती सेनन (kriti sanon), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि अभिनेता अरशद वारसी (Arshad Warsi) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
18 मार्च रोजी होळीच्या दिवशी बच्चन पांडे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बच्चन पांडेचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'धूम धड़ाका रंग पटाखा, आओ बना लो टोली… इस बार बच्चन पांडे ला रहे हैं। होली पे गोली !', असं हटके कॅप्शन देऊन अक्षय कुमारनं या चित्रपटाचा ट्रे्लर शेअर केला आहे. जॅकलिन आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
अक्षय या सिनेमात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयचा हा नवा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने या सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले होते,"या भूमिकेच्या अनेक छटा आहेत. 'बच्चन पांडे' तुम्हाला घाबरवायला, हसवायला आणि रडवायला तयार आहे. फक्त तुम्ही प्रेमाचा वर्षाव करा".
हेही वाचा :
Disha Patani : 80 किलो वजन उचलून दिशाचं वर्कआऊट; टायगरची बहिण आणि आई म्हणाली...
Madhuri Dixit : 'हे' गाणं पाहण्यासाठी माधुरी बुरखा घालून गेली चित्रपटगृहात ; सांगितला किस्सा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)