एक्स्प्लोर

सलमान-आमीरवर मात, शाहरुखचा विक्रम मोडण्यात प्रभास अपयशी

मुंबई : 'बाहुबली 2' म्हणजेच 'बाहुबली : द कन्क्ल्युजन' हा चित्रपट फक्त भारतातीलच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गेल्या दोन वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या या चित्रपटाने 'कटप्पाने बाहुबली को क्यों मारा' हे कोडं अखेर सोडवलं. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी नाही, तर अब्जावधीचा गल्ला जमवणाऱ्या 'बाहुबली 2' ला शाहरुख खानचा एक विक्रम मात्र मोडता आलेला नाही. बाहुबली 2 च्या हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी 41 कोटींचा गल्ला जमवला. पहिल्या दिवशीच्या कमाईत प्रभासने आमीर आणि सलमानच्या चित्रपटांना मागे टाकलं असलं, तरी शाहरुखच्या सिनेमावर मात करण्यात तो अपयशी ठरला. https://twitter.com/taran_adarsh/status/858195856427634692 सलमान खानच्या सुलतान चित्रपटाने पहिल्या दिवशी 36.54 कोटी रुपये जमवले, तर दंगलने 29.78 कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे साहजिकच हिंदीत आमीर-सलमानचे ओपनिंग डे चे रेकॉर्ड प्रभासकडून मोडित निघाले. मात्र ओपनिंग डेला हिंदी 'बाहुबली 2' शाहरुख खानच्या 'हॅपी न्यू इयर'च्या तुलनेत तोकडा पडला. 'हॅपी न्यू इयर'ने पहिल्या दिवशी 45 कोटी, म्हणजेच बाहुबली 2 पेक्षा 4 कोटी जास्त कमवले होते. https://twitter.com/taran_adarsh/status/859246176108920832

मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन

बाहुबली 2 नं पहिल्याच दिवशी भारतात एकूण (सर्व भाषा मिळून) 121 कोटींची कमाई केली होती. यात हिंदीतील 41 कोटींशिवाय, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम यांच्या एकूण 80 कोटींच्या कमाईचा समावेश आहे. हिंदी भाषेत बाहुबली 2 ला दीडशे कोटींचा टप्पा पार करण्यास चार दिवस (28 एप्रिल ते 1 मे - एक्स्टेंडेड वीकेंड) लागले. ‘बाहुबली द कन्क्लुजन’ने तीन दिवसात हिंदी भाषेत 128 कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी बाहुबली 2 ने पहिल्या दिवशी 41 कोटी, दुसऱ्या दिवशी 40.5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 46.5 कोटी रुपयांची कमाई तर चौथ्या दिवशी (1 मे - एक्स्टेंडेड वीकेंड) 35 कोटी कमावले. म्हणजेच पहिल्या चार दिवसात हिंदी भाषेत अंदाजे 160 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन झालं आहे. पहिला दिवस - शुक्रवार 28 एप्रिल - 41 कोटी दुसरा दिवस - शनिवार 29 एप्रिल - 40.5 कोटी तिसरा दिवस- रविवार 30 एप्रिल- 46.5 कोटी चौथा दिवस - सोमवार 1 मे - 35 कोटी बाहुबली 2 ने पहिल्या वीकेंडला (शुक्र ते रविवार म्हणजे 28 एप्रिल ते 30 एप्रिल 2017) जगभरात तब्बल 540 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तीन दिवसातली कमाई पाहता आमीरच्या 'पीके'ला मागे टाकण्यास बाहुबली 2 ला एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही, असं भाकित चित्रपट क्षेत्रातले जाणकार व्यक्त करतात. https://twitter.com/taran_adarsh/status/859245946391060480 युनाईटेड स्टेट्समध्ये बाहुबली 2 हा तिसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. विन डिझेलच्या 'फास्ट अँड फ्युरियस 8' 'बाहुबली 2' पेक्षा सरस ठरला. विशेष म्हणजे अमेरिकेत फक्त 420 स्क्रीन्सवर झळकूनही तिथे 10 मिलियन डॉलर (64.13 कोटी) रुपये कमवण्यात यश आलं. https://twitter.com/taran_adarsh/status/858976912168833026 'बाहुबली 2' म्हणजेच 'बाहुबली : द कन्क्ल्युजन' हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला.  ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता. बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली 1 हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

संबंधित बातम्या

बाहुबली बनवणारे राजमौली कोण?

सर्व विक्रम मोडीत, 'बाहुबली 2' ची विकेंडला ऐतिहासिक कमाई

भल्लालदेवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं!

‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2, तिकीट अवघं..

अंडरटेकरची भेट, ते मानधन, 'बाहुबली'च्या 15 फॅक्ट्स !

'बाहुबली 2' पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? उत्तर मिळणार?

दुबईत 'बाहुबली 2' प्रदर्शित, कटप्पा-बाहुबलीचं उत्तर मिळालं?

‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!

‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक

पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ

कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…

‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट

रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर

VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Bollywood Actress Ananya Raj Death: गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राजनं घेतला जगाचा निरोप, पण मृत्यूचं कारण नेमकं काय? धक्कादायक बाब समोर!
गाढ झोपेत अभिनेत्री अनन्या राजचा मृत्यू, सिनेविश्वात खळबळ, मृत्यूचं हादरवणारं कारण समोर!
Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget