मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. अशात अभिनेता आयुष्मान खुराना याने शहीद जवानांवर एक भावूक कविता लिहिली आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर ही कविता शेअर केली आहे.

पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनाने पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर देशाभरातून तिव्र प्रतिक्रिया येत आहे.


या हल्ल्यामुळे दु:खी झालेल्या अभिनेता आयुष्मान खुराना याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर भावूक कविता शेअर केली आहे. या कवितेत जवानांच्या कुटुंबीयांच्या स्थितीबद्दल त्याने लिहिलं आहे.

यापूर्वी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान, अक्षय कुमार, मनोज वाजपेयी, जान्हवी कपूर यांनी आपल्या भावना व्याक्त केल्या होत्या. तर अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक इंग्रजी कविता सादर करुन त्याची व्हिडीओ शेअर केली होती.

कविता
देश का हर जवान बहुत ख़ास है,
है लड़ता जब तक श्वास है,
परिवारों के सुखों का कारावास है,
शहीदों की माओं का अनंत उपवास है,
उनके बच्चों को कहते सुना है,
पापा अभी भी हमारे पास हैं!