नवी दिल्ली : उरी चित्रपटाच्या टीमने जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रुवाला यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा निषेध करत देशाभरात जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. शिवाय जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचे हात पुढे आले होते.
पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित 'उरी' हा सिनेमा बनवण्यात आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रुवाला यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.
उरीची टीम आर्मी वेल्फेअर फंडला एक कोटी देत आहे. तसेच ही रक्कम पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मिळावी, अशी तरतूद करण्यात येणार आहे, असं रॉनी स्क्रुवाला यांनी सांगितलं आहे. शिवाय देशवासियांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी काल पुलवामामध्ये शहीद झालेलया जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत करण्याचं जाहीर केलं होतं. शिवाय शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारताचा माजी तडफदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुढे आला आहे. तर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने जवानांच्या 100 मुलांना मदत करणार असल्याचं म्हंटलं आहे.
शहीदांच्या कुटुंबीयांना उरी चित्रपटाच्या टीमकडून 1 कोटीची मदत, सेहवाग-गंभीरही आले पुढे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2019 11:59 AM (IST)
या सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रुवाला यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -