Ayushman Khurana: बॉलीवूडचा चार्मिंग ॲक्टर असे ओळख असणारा आयुष्मान खुराणा शेवटचा ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसला होता . या फिल्मनंतर अजून आयुष्मान खुराणा चा कोणताही सिनेमा आला नाही . दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये त्याने त्याच्या लहानपणीच्या ट्रॉमाच्या काही आठवणी शेअर केल्या . वडिलांकडून बेल्ट आणि चप्पलने खाल्लेला मार आठवत त्याने लहानपणीच्या आठवण सांगितली . आयुष्यमानने ऑनस्टली सिंग पॉडकास्टशी संवाद साधताना तो लहान वयातच कसा वडील बनला हे त्याने सांगितलं .
आयुष्मानने वडिलांचे वर्णन हुकूमशहा म्हणून केलं ..
आयुष्मान खुराणा आणि अपारशक्ती खुराणा या दोघांच्या नात्याविषयी कायम बोललं जात असताना वडिलांच्या नियमाविषयी ही अनेक ठिकाणी बोललं जातं . नुकताच एका पोडकास्ट शो मध्ये आयुषमानने त्याच्या त्याचा वडिलांचे वर्णन हुकूमशहा असं केलं . आणि सांगितलं की लहान असताना त्याचे वडील त्याला चप्पल आणि बेल्टने मारायचे . असं करणं त्यांच्यासाठी खूप सामान्य गोष्ट होती . पण त्यामुळे त्याच्या बालमनावर आघात झाल्याचं आयुष्मान सांगतो .
वडिलांच्या भीतीने सिगारेटला हातही लावला नाही पण तरीही ..
आयुष्मान आपल्या वडिलांना हुकूमशहा संबोधत एक किस्सा सांगतो, एके दिवशी मी पार्टीतून वापस येत असताना माझ्या शर्टच्या खिशातून सिगारेटचा वास येत होता . वडिलांच्या भीतीने मी कधीही सिगारेटला हातही लावला नाही . पण तरीही त्यांनी मला फोडून काढलं होतं .असं तो सांगतो . लहानपणी वडिलांचा चप्पल आणि बेल्टने मार खाल्लाचही आयुष्मान सांगतो . या गोष्टीचा लहान असतानाच माझ्या मनात आघात झाल्याचही त्यानं या मुलाखतीत सांगितलं .
वडील होणं ही फार वेगळीच गोष्ट आहे ..
मी विसाव्या वर्षी वडील झालो . विकी डोनर हा चित्रपट मी वडील झाल्यानंतर प्रदर्शित झाला होता . तू काळ माझ्यासाठी अतिशय वेगळा होता . मी अनिता हिरा दोघेही एकत्र वाढलो कारण मी खूप लहान पालक होतो . सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मला एक मुलगी आहे . मुलगी झाल्यानंतर मी एक चांगला माणूस बनलो . मुली आपल्याला अधिक संवेदनशील बनवतात असंही आयुष्मान सांगतो .