Swara Bhaskar Troll: अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून (Anushakti Nagar Assembly Constituency) विद्यमान आमदार नवाब मलिकांची (Nawab Malik) मुलगी सना मलिक (Sana Malik) आणि तिच्या विरोधात अभिनेत्री स्वरा भास्करचे (Swara Bhaskar) पती फहाद अहमद (Fahad Ahmad) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. स्वरा भास्कर पतिचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. अशातच सध्या स्वरा भास्करचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 36 वर्षीय स्वरा भास्करचा पती फहाद अहमदसोबतचा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. पण, चर्चा या दोघांच्या फोटोमुळे नाहीतर, फोटोत त्यांच्यासोबत असलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे झाली. स्वरा आणि फहादसोबत फोटोत दिसणारी ती तिसरी व्यक्ती म्हणजे, मौलाना सज्जाद नोमानी. सध्या नोमानी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. व्हिडीओमधील नोमानींच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. 


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी, स्वरा आणि फहादसोबत आहेत. नोमानी यांच्या शेजारी उभी असलेली स्वरा फोटो क्लिक करताना दिसली. या फोटोमध्ये स्वराला केवळ मौलाना यांच्याबद्दल ट्रोल केलं जात नाही, तर तिच्या लूकवरूनही नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत.


"साहब की खिदमत में हाजिर हुए..."


स्वरा भास्करचा मौलाना यांच्यासोबतचा फोटो तिचा पती फहज अहमद यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. एका फोटोमध्ये फहाद मौलाना यांच्यासोबत एकटे आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये ते त्याची पत्नी अभिनेत्री स्वरा भास्करसोबत आहे. फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, सर, हजरत मौलाना सज्जाद नोमानी साहेबांच्या सेवेत हजर झालो आणि त्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेत..."






पतीसाठी स्वरा निवडणुकीच्या प्रचारात


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फहाद अहमद यावेळी राष्ट्रवादीकडून अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तिची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. या जागेवरून फहाद अहमद माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत स्वरा भास्कर पतीच्या प्रचारासाठी रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या अंतर्गत तिनं मौलाना नोमानी यांची भेट घेतली होती.


लूकमुळे स्वरा भास्कर ट्रोल


व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये स्वरा भास्करनं पीच कलरचा चिकनकारी ड्रेस घातला आहे. तसेच, अभिनेत्रीनं ओढणीनं आपलं डोकं पूर्णपणे बांधलं आहे. तिचा लूक, वाढलेलं वजन आणि बुरखा न घालणं यावरुन तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे. यामागील एक कारण म्हणजे, अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सामाजिक समस्या आणि महिलांच्या हकांवर बोलत असते. 


मौलाना नोमानींचं वादग्रस्त वक्तव्य 


स्वरा आणि तिच्या पतीनं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मौलाना नोमानी यांची भेट घेतली. एका वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला. ज्यात ते म्हणाले होते की, "मुलगी हिजाब घालून कॉलेजला जात आहे की, नाही यानं काही फरक पडत नाही, तिला एकटं सोडू नये. जर तुम्हाला तुमच्या मुलींना कॉलेजमध्ये पाठवायचं असेल, तर कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटा आणि त्यांना विचारा की, ती सर्व लेक्चरला बसते की, लेक्टर सोडून दुसरीकडे जाते."