Atrangi Re Release On OTT On This Date : सारा अली खान (Sara Ali Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुषचा (Dhanush) आगामी  'अतरंगी रे' सिनेमाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सिनेमातील धनुषच्या (Dhanush Bollywood Movie) भूमिकेची ओळख करुन देणारा व्हिडीओ सारा अली खानने शेअर करत कॅप्शन लिहिली आहे,"आमच्या सिनेमातील पहिल्या पात्राला भेटा. विशू असे या पात्राचे नाव आहे". त्यांनी साकारलेले हे पात्र दुसरा कोणी अभिनेता साकारू शकला नसता. राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला हा अभिनेता नेहमी सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो". त्यानंतर साराने अक्षय कुमारच्या (Akshay Kumar New Movie) पात्राचा परिचय करून दिला आहे.





सारा अली खानने अक्षय कुमारच्या पात्राचा इंस्टाग्रामवर परिचय करून देत लिहिले आहे, "अतरंगी रे सिनेमात अक्षय कुमार अनोख्या अंदाजात एन्ट्री करणार आहे. मिस्टर अक्षय कुमारला भेटण्यासाठी तयार राहा. सिनेमात सारा अली खान रिंकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या भूमिकेविषयी तिने म्हटले आहे,"रिंकूला भेटण्याची वेळ आली आहे. तिला भेटण्यासाठी तयार राहा".





'अतरंगी रे' सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल रायने केले आहे. तर हिंमाशु शर्माने या सिनेमाचे लेखन केले आहे. या सिनेमाचा ट्रेलर 24 नोव्हेंबरला डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तिघेही एकत्र काम करणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष अनेक दिवसांनी हिंदी सिनेमात दिसणार आहे. 


संबंधित बातम्या


Aamir Khan Third Wedding : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार?


Priyanka Chopra ने इन्स्टाग्राम, ट्विटरवरुन हटवले Nick Jonas चे आडनाव... सोशल मीडियावर रंगल्या घटस्फोटाच्या चर्चा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha