Rubina Dilaik Slam Trollers : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस 14 या शोची विजेती रुबीना दिलैक (Rubina Dilaik)सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. रुबीनाच्या सोशल मीडियावरील पोस्टना नेटकऱ्यांची पसंती मिळते. पण काही जण तिला वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करत आहेत. या ट्रोलर्सना सडोतोड उत्तर देत रूबीनाने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. 


रूबीनाची पोस्ट
रूबीनाने तिचे फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले, 'मला असे लक्षात आले आहे की माझ्या वाढलेल्या वजनामुळे अनेकांना खूप त्रास होत आहे. माझा द्वेष करणारे मेल्स आणि मेसेज मला  येत आहेत.  मी चांगले कपडे घालत नाही, मी जाड झाले किंवा माझ्याकडे मोठे प्रोजेक्ट्स नाही या सर्व कारणांमुळे मला लोकांकडून अशा धमक्या येत आहेत की, ते माझे चाहते राहणार नाहीत. मी चाहत्यांच्या या प्रतिक्रियांमुळे खूप निराश झाले. हे माझे आयुष्य आहे. माझ्या आयुष्यातील ह एक टप्पा सुरू आहे.  माझे चाहते देखील माझ्या आयुष्याचाच एक भाग आहात. पण माझ्या कामापेक्षा माझ्या शरीराला आणि माझ्या फिटनेसला महत्व देणाऱ्यांनी स्वत:ला माझे फॅन्स म्हणणे बंद करावे.'






Ajay Devgn : अजय देवगण नाही... तर 'हे' आहे बॉलिवूडच्या सिंघमचं खरं नाव; पण का बदललं नाव?


काही दिवसांपूर्वी रूबीनाला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी  रूबीनाचे 7 किलो वजन वाढले, अशी माहिती तिने सोशल मीडियावरून दिली होती. रूबीनाच्या छोटी बहू, जनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: जेठालाल, बबिता अन् पोपटलाल; Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेतील 'हे' कलकार एका एपिसोडसाठी घेतात लाखोंचं मानधन