Aamir Khan Third Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमीर खान (Aamir Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी आमीरचा किरण रावसोबत (Kiran Rao) घटस्फोट झाला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आता आमीर  तिसरं लग्न करणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 
 
एका रिपोर्टनुसार, आमीर लवकरच तिसरं लग्न करणार आहे. अशी चर्चा आहे की, एका चित्रपटातील को-स्टारसोबत आमीर लग्नगाठ बांधणार आहे. आमीर कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करणार?, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.  आमीरने अजून त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. लवकरच आमीरचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  रिपोर्टनुसार, लाल सिंह चड्ढा हा  चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमीर त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल चाहत्यांना माहिती देणार आहे.  






हम है राही प्यार के, राजा हिंदूस्थानी, लगान, दिल चाहता है, फना, रंग दे बसंती, गजनी, तारे जमिन पर, धूम 3 आणि पिके या आमीरच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आमीरने 1986 मध्ये रीना दत्तासोबत लग्न केले होते. रिना आणि आमिरला ईरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. रिनासोबत घटस्फोट झाल्यानंतर  2005 साली आमीरने किरण रावसोबत लग्नगाठ बांधली. दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे. आमीर आणि किरणने 2021 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 


Aamir Khan movie Laal Singh Chaddha : आमीरच्या ‘लाल सिंह चड्ढा' ची रिलीज डेट ठरली; आमिर-करिनाच्या लूकनं वेधलं लक्ष


लाल सिंह चड्ढा हा 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.  आमिर खान प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया अकाऊंटने  नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आमिर आणि करिना खास लूकमध्ये दिसत आहे.  या चित्रपटात करिना आणि आमीरसोबतच अभिनेता नागा चैतन्य आणि मोना सिंग देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. 


Biggest Box Office Clash: यशच्या KGF 2 आणि आमिरच्या Laal Singh Chaddha ची बॉक्स ऑफिसवर टक्कर