Priyanka Chopra Surname Change : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनासच्या (Nick Jonas) चाहत्यांना धक्का बसला आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून जोनास आडनाव काढून टाकले आहे. त्यामुळे प्रियांका आणि निकच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावत आहेत. प्रियांकाची आई मधु चोप्राने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. 


प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या संबंधांबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. यावर स्पष्टीकरण देत मधु चोप्राने सोशल मीडियावर लिहिले आहे,"प्रियांका चोप्रा आणि निकचं नातं तुटलेलं नाही. कृपया अशा अफवा पसरवू नका. दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे."






लग्नानंतर बदलले होते नाव
प्रियांकाने निक जोनाससोबत 2018 साली मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. त्यानंतर प्रियांकाने तिचे नाव 'प्रियांका चोप्रा' बदलत 'प्रियांका चोप्रा जोनास' ठेवले होते. पण आता प्रियांकाने तिच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून जोनास नाव हटवले आहे. त्यामुळे दोघांच्या नात्यासंबंधी अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.






प्रियांका आणि निकने दिवाळी एकत्र साजरी केली होती. लग्नानंतर दोघांनी पहिल्यांदाच एकमेकांसोबत दिवाळी साजरी केली होती. पारंपरिक पद्धतीने दीपावली साजरी करताना दोघेही दिसून आले होते. फोटोंत दोघेही आनंदात दिसत होते. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha