Allu Arjun : अ‍ॅटली कुमार (Atlee Kumar) हा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि नयनताराच्या 'जवान' या सिनेमाने अ‍ॅटली कुमारला सुपरस्टार बनवलं आहे. आता अ‍ॅटली कुमारच्या आगामी सिनेमात अल्लू अर्जुन (Allu Arjun) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.

Continues below advertisement


अ‍ॅटलीचा 'जवान' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. वर्षातला हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. आजही चाहत्यांमध्ये जवान या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. अशातच अ‍ॅटलीने आता त्याच्या आगामी सिनेमाचे संकेत दिले आहेत. अ‍ॅटली कुमार आता अल्लू अर्जुनसोबत सिनेमा बनवणार आहे.


अल्लू अर्जुनचा नवा अंदाज


मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅटली कुमार आणि अल्लू अर्जुन यांच्यात काही दिवसांपासून एका सिनेमासंदर्भात चर्चा होत आहे. एटली कुमार 2024 च्या अंतिम टप्प्यात आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनची भूमिका खास असणार आहे. कधीही न पाहिलेल्या अंदाजात अल्लू अर्जुन दिसणार आहे. अद्याप एटली किंवा अल्लू अर्जुनने आगामी सिनेमासंदर्भात काहीही माहिती दिलेली नाही. लवकरच ते आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.


अल्लू अर्जुन आणि एटली एकत्र काम करणार


अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटली कुमार एकत्र काम करणार आहेत. जानेवारी 2024 मध्ये ते या सिनेमाबाबतची घोषणा करू शकतात. अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2' या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर एटली त्याच्या आगामी सिनेमाची शूटिंग पूर्ण करेल. 


अ‍ॅटलीने आगामी सिनेमासाठी अनेक बॉलिवूडकरांसोबत संपर्क साधला आहे. अ‍ॅटली गेल्या दोन महिन्यांत सलमान खान, शाहरुख खान, हृतिक रोशन आणि रणबीर कपूर यांना भेटला आहे. पण नव्या प्रोजेक्टसंदर्भात काहीही माहिती समोर आलेली नाही. पण या सिनेमात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत दिसणार असे म्हटले जात आहे. एटलीसोबत आणखी कोण कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Jawan OTT Release : शाहरुखच्या वाढदिवशी चाहत्यांना मनोरंजनाची 'ट्रीट'; 'जवान' ओटीटीवर रिलीज