मुंबई : बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना राणावत आता कबड्डीच्या मैदानात उतरुन ‘पंगा’ घेणार आहे. आगामी ‘पंगा’ सिनेमात राष्ट्रीय कबड्डीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे.


बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी या ‘पंगा’ सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. त्यांनीच मंगळवारी या सिनेमाबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. अभिनेत्री कंगना राणावत, गायक-अभिनेता जस्सी गिल आणि अभिनेत्री नीना गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत.

फॉक्स स्टार हिंदीने निर्मिती केलेला ‘पंगा’ सिनेमा पुढल्या वर्षी 2019 साली प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यात कंगना राणावत, जस्सी गिल आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका असतील, अशी माहिती दिग्दर्शिका अश्विनी तिवारी यांनी ट्विटरवरुन दिली.


कंगना राणावतने सुद्धा ‘पंगा’ सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता असल्याचे सांगितले. तसेच, “या सिनेमाबाबत माझ्यासाठी खास आहे, एक म्हणजे, राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूची भूमिका निभावता येणार आहे, तसेच फॉक्स स्टार टीमसोबतही काम करण्यास उत्सुक आहे.”, असे कंगना म्हणाली.