Ashish Vidyarthi Wedding: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आशीष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. त्यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) यांच्यासोबत आज (25 मे)  रज‍िस्‍टर्ड मॅरेज केलं आहे. आशीष आणि रुपाली यांनी लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे देखील आयोजन केलं आहे.


'आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न होणे ही एक विलक्षण भावना आहे.' असं आशीष यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं. रुपाली बरुआ यांचे कोलकाता येथे एक फॅशन स्टोर आहे. रुपाली यांच्यासोबतच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारण्यात आल्यानंतर आशीष म्हणाले, "अहो, ती एक मोठी कथा आहे. मी नंतर तुम्हाला सांगेल." यावर रुपाली म्हणाल्या, "आम्ही काही काळापूर्वी भेटलो होतो आणि आम्ही आमचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. आमचे लग्न अगदी साधेपणाने व्हावे अशी आम्हा दोघांची इच्छा होती."



आशीष विद्यार्थी  आणि रुपाली बरुआ यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघांच्या गळ्यात हार दिसत आहेत. सध्या आशीष यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटकरी शुभेच्छा देत आहेत. 






रुपालीपूर्वी आशीष विद्यार्थी यांनी अभिनेत्री राजोशी विद्यार्थीसोबत लग्न केले होते. राजोशी एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि नाट्य कलाकार आहेत.


आशीष विद्यार्थी यांचे चित्रपट


आशीष विद्यार्थी यांनी  ‘नाजायज’, ‘जीत’, ‘भाई’, ‘रेस’, ‘जिद्दी’, ‘मेजर साब’, ‘सोल्जर’, ‘हसीना मान जायेगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘वास्तव’ या चित्रपटात त्यांनी 'विठ्ठल काणीया' या भूमिकेमुळे त्यांनी विशेष लोकप्रियता मिळाली.आशीष विद्यार्थी यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकरली आहे. आशीष हे त्यांच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतात. 


काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना  यांच्या  'गुडबाय' या चित्रपटात देखील आशीष यांनी काम केले होते. आशीष हे सोशल मीडियावर  सक्रिय असतात आणि ते फूड ब्लॉगिंग देखील करतात. इन्स्टाग्रामवर त्यांना  1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :   


मोठ्या पडद्यावर एक-दोन नव्हे तब्बल 150हून अधिक वेळा यमसदनी गेलेला लाडका खलनायक! वाचा अभिनेते आशीष विद्यार्थींबद्दल...