एक्स्प्लोर

अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई

मुंबई : मुन्नाभाई सीरिजमधील 'सर्किट' या व्यक्तिरेखेमुळे प्रकाशझोतात आलेला बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अर्शदच्या मुंबईतील वर्सोवा परिसरातील बंगल्याचा काही भाग मुंबई महापालिकेने जमीनदोस्त केला आहे. बेकायदेशीरपणे अतिरिक्त मजला बांधल्याप्रकरणी बीएमसीने सोमवारी अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई केली. या कारवाईत त्याने विनापरवाना बांधलेला मजला तोडण्यात आला. विशेष म्हणजे या अनधिकृत बांधकामाबद्दल पालिकेला चार वर्षांपूर्वीच माहिती मिळाली होती. पालिका अधिकारी कारवाईसाठी पोहचले, त्यावेळी बंगल्याला कुलूप होतं. त्यामुळे केवळ प्रतिकात्मक कारवाई करण्यात आली. 'टाइम्स ऑफ इंडिया'तील वृत्तानुसार मुंबईच्या वर्सोवा भागातील एअर इंडिया सहकारी सोसायटीतील बंगला क्रमांक 10 (शांतिनिकेतन) बाहेर महापालिकेने कारवाईची नोटीस लावली होती. या नोटिशीनुसार अर्शद वारसीला दुसऱ्या मजल्यावरील एक हजार 300 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम 24 तासात पाडण्याचा इशारा देण्यात आला होता. या नोटिशीला अर्शद वारसीने काहीच उत्तर न दिल्यामुळे बीएमसीने सोमवारी प्रतिकात्मक कारवाई केली. वारसीने या वृत्ताला दुजोरा दिल्याचंही 'टाइम्स'ने म्हटलं आहे. एअर इंडियातील निवृत्त कॅप्टनकडून अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी यांनी 2012 मध्ये बंगला खरेदी केला होता. नूतनीकरण करताना त्यांनी बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती आहे. सोसायटीतील सदस्यांनी अर्शद वारसीविरोधात पालिकेकडे तक्रार केली होती. पालिकेच्या तपासणीत सोसायटीतील अनेकांनी अशाप्रकारे अनधिकृत बांधकाम केल्याचं निदर्शनास आलं. 2013 मध्ये पालिका कारवाई करण्याच्या तयारीत असताना अर्शदने त्यावर स्थगिती आणली. मात्र कोर्टाने नुकताच हा स्टे उठवल्याने पालिकेने कारवाई केली.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
Ajinkya Deo Maherchi Saadi: 'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Embed widget