Anshula Kapoor : अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. याच कारण म्हणजे अंशुलाचा फॅट टू फिट अवतार. अर्जुनच्या बहिणीचे हे बदलेल रुप पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. अंशुला कपूरचे असे रूप तुम्ही कुठेही पाहिले नसेल. भाऊ अर्जुन कपूरप्रमाणे अंशुला कपूरनेही हा फॅट टू फिट प्रवास केला आहे.
अंशुला या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. अंशुला कपूरचा हा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. मोकळे केस आणि सैल टी-शर्ट घातलेली अंशुला एकदम फिट दिसत आहे. तिच्या फोटोवर काका संजय कपूरसह कतरिना कैफसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अंशुला नेहमीच तिच्या भावाची आणि वडिलांची लाडकी राहिली आहे, त्यामुळे अंशुलाचे हे परिवर्तन पाहून तिच्या कुटुंबीयांना खूप अभिमान वाटत आहे.
संबंधित बातम्या
- Garjato Marathi : मराठी भाषा दिनानिमित्त सादर होणार 'गर्जतो मराठी' विशेष कार्यक्रम
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचा; आलियाचं नाव न घेता कंगनाने केलं कौतुक
- Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकलेचं ट्वीट चर्चेत; म्हणाला, 'करण तुला 150 रूपये देतो, तू...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha