Garjato Marathi : 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी' या ओळी प्रत्येक मराठी माणसाला तोंडपाठ असतात. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारीला 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा यासाठी 'गर्जतो मराठी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


27 फेब्रुवारी रोजी झी मराठीवर 'गर्जतो मराठी' हा कार्यक्रम रंगणार आहे. हा दोन तासांचा सांगीतिक कार्यक्रम असणार आहे. या विशेष कार्यक्रमात नृत्य, सदाबहार मराठी कविता आणि गाणी यांचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच मराठी साहित्याचं दर्शन प्रेक्षकांना घडेल.





अभिनेत्री गिरीजा ओक आणि हृषीकेश जोशी या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. स्पृहा जोशी, संदीप पाठक,  किशोर कदम, विभावरी देशपांडे आणि चंद्रकांत काळे प्रेक्षकांना कविता ऐकवणार आहेत. तसेच मंगेश बोरगावकर, हृषीकेश रानडे, केतकी भावे आणि धनश्री देशपांडे गाणी गाणार आहेत. तर मयुरेश पेम, धनश्री काडगावकर, शुभंकर तावडे आणि केतकी पालव या कलाकारांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळेल.


संबंधित बातम्या


Ananya : बहुचर्चित 'अनन्या' नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार


Ajay-Atul : अजय-अतुलच्या संगीत मैफिलची मेजवानी आता घरबसल्या, 'मराठी भाषा दिनी' रंगणार भव्य संगीत सोहळा


Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha