Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने (Tabu) नुकतेच 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तब्बूने इंस्टाग्रामवर केक कापतानाचे फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'भूल भुलैया 2' हा सिनेमा 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा आधी जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. नंतर हा सिनेमा 25 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण एसएस राजामौलींचा आरआरआर सिनेमा त्याचदिवशी प्रदर्शित होत असल्याने 'भूल भुलैया 2' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 


तब्बूच्या 'भूल भुलैया 2' सिनेमात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, तब्बू आणि राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बज्मीने केले आहे. कार्तिक, कियारा आणि तब्बू या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यादांच एकत्र काम करताना दिसून येणार आहेत.






फरहाद सामजी आणि आकाश कौशिकने 'भूल भुलैया 2' सिनेमाचे लेखन केले आहे.  2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या 'भूल भुलैया' सिनेमाचा हा सिक्वेल आहे. भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमारने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 


संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचा; आलियाचं नाव न घेता कंगनाने केलं कौतुक


Ananya : बहुचर्चित 'अनन्या' नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha