Malaika Arora and Arjun Kapoor Enjoying in Maldives: अभिनेत्री मलायका आरोरा (Arjun Kapoor) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Malaika Arora) ही बॉलिवूडमधील चर्चेत असणारी जोडी आहे. अर्जुन आणि मलायका यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमी उत्सुक असतात. दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. काही दिवसांपूर्वी ते दोघे मालदिवमध्ये गेले होते. मालदिवमधील एक भन्नाट व्हिडीओ अर्जुनने नुकतेच शेअर केला. त्याने या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे.
अर्जुनने स्विमिंग पूलमध्ये वर्क-आऊट करतानाचा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. 'मी सुट्ट्यांमध्ये पण वर्क-आऊट करतोय. मलायका थँक यू' असं कॅप्शन अर्जुननं या व्हिडीओला दिले. मलायका आणि अर्जुनने त्यांच्या मालदिव ट्रिपमधील रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
मलायका आणि अर्जुन अनेक वेळा सोशल मीडियावर त्यांचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. त्यामुळे या दोघांच्या लग्नाबाबत त्याचे फॅन्स उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अर्जुनने सांगितले होते, 'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.