Arbaaz Khan Shura Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) वयाच्या 56 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. अर्पिता खानच्या घरी अरबाजचा लग्नसोहळा पार पडला आहे. गर्लफ्रेंड शुरा खानसोबत (Shura Khan) त्याने दुसरं लग्न केलं आहे. शुरा ही मेकअप आर्टिस्ट आहे.


अरबाज आणि शुरा यांच्या लग्नसोहळ्याला सलमान खानसह (Salman Khan) अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अरबाज आणि शुरा यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अर्पिताच्या घरी अरबाज आणि शुरा यांचा निकाह झाला आहे.


अरबाज खानच्या लग्नसोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी 


अरबाज खानच्या लग्नसोहळ्याला मोठ्या संख्येने सेलिब्रिटी उपस्थित होते. रिद्धिमा पंडित, सोहेल खान तिचा मुलगा निर्वाण, सलमान खान, यूलिया वंतूर, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, सलीम खान, सलमा, अरबाज खान, अरहान खान, सोहेल खान, रवीना टंडन, अनिल थडानी, वरुण शर्मा, काँग्रेस नेते बाबा सिद्धीकी, फरहा खान, साजिद खान, राजकुमार संतोषी, अलिजेह अग्निहोत्री, संजय कपूर, महीप कपूर, यास्मिन कराची वाला, वालुशा डिसूजा, साजिद खान, साजिद नाडियादवाला या सेलिब्रिटींनी अरबाज-शुराच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.






शुराआधी मलायकासोबत केलेलं लग्न


शुरा खानआधी अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. काही दिवसांपूर्वीच जॉर्जियासोबत त्याचा ब्रेकअप झाला आहे. त्यानंतर त्याने शुराला डेट करायला सुरुवात केली. शुरासोबत लग्न करण्याआधी अरबाज खान मलायका अरोरासोबत (Malaika Arora) लग्नबंधनात अडकला होता. पण 2017 मध्ये ते विभक्त झाले. शूरा ही मेकअप आर्टिस्ट असून हेअर स्टायलिस्टदेखील आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे.


अरबाजने शेअर केले लग्नसोहळ्याचे फोटो (Arbaaz Khan Shared Wedding Photo)


अरबाज खानने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अरबाज आणि शुरा रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"आपल्या प्रियजनांच्या उपस्थितीत मी आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे".


संबंधित बातम्या


Arbaaz Khan Marriage: मलायका-अर्जुन कपूरची चर्चा सुरु असतानाच अरबाज खानच्या लग्नाची तारीख सुद्धा ठरली! त्याची होणारी बायको आहे तरी कोण?