Arbaaz Khan: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) भाऊ आणि अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) हा लवकरच बोहल्यावर चढणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अरबाज खान मेकअप आर्टिस्ट शौर खानला (Shura Khan) सध्या डेट करत असून तो तिच्यासोबत लवकरत लग्नगाठ बांधणार आहे. अरबाज आणि शौर यांच्या लग्नाची तरीख देखील ठरली आहे.


अरबाज आणि शौरा 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ


इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अरबाज खान हा 24 डिसेंबरला पुन्हा एकदा लग्न करणार आहे. तो 24 डिसेंबरला शौरा खानसोबत लग्न करणार आहे. या लग्नात फक्त अरबाजच्या आणि शौराच्या कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र उपस्थित राहणार आहेत. लग्न मुंबईतच होणार आहे. शौरा आणि अरबाज यांची भेट पटना शुक्ला या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. नंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.लग्नाबाबत अरबाज आणि शौरानं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.


कोण आहे अरबाजची होणारी पत्नी शौरा?


शौरा ही सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. ती इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसोबत काम करते. शौरा ही रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा यांची मेकअप आर्टिस्ट देखील आहे. आता ती खान कुटुंबाची सून होणार आहे.






अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट


अरबाज खानने यापूर्वी अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न केले होते. डिसेंबर  1998 मध्ये अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले होते. पण  19 वर्षाच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाज यांना एक मुलगा देखील आहे. त्याचे नाव अरहान असं आहे.


जॉर्जिया एंड्रियानीला अरबाजने केले डेट


मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजने जॉर्जिया एंड्रियानीला डेट केले.  पण नंतर अरबाज आणि जॉर्जिया एंड्रियानी यांचा ब्रेकअप झाला. अरबाजबद्दल एका मुलाखतीत जॉर्जिया म्हणाली, 'आम्ही खूप चांगले मित्र होतो. मला त्याच्याबद्दल नेहमीच भावना असतील. अरबाजचे मलायकासोबतचे नाते कधीच आमच्यात आले नाही. मला आता स्वत:ला कोणाची गर्लफ्रेंड म्हणून घ्यायचं नाहीये. हे फार काळ टिकणार नाही हे आम्हा दोघांनाही माहीत होते."


संबंधित बातम्या:


Malaika Arora And Arbaaz Khan: 19 वर्षे टिकलेले मलायका आणि अरबाजचे नाते कोणत्या कारणामुळे तुटले? स्वत: आरबाजनं केला खुलासा