Upcoming South Films : सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला आहे. 'पुष्पा द राइज' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सध्या 'आरआरआर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तसेच येत्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


केजीएफ 2  (KGF 2) : 'केजीएफ 2' (KGF 2) हा 2022 वर्षातला सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रॉकी भाई पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. या सिनेमाचा पहिला भाग 2018 साली प्रदर्शित झाला होता. तेव्हा या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 'केजीएफ 2' हा सिनेमा आता 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात यश, संजय दत्त, रवीना टंडन आणि प्रकाश राजसारखे कलाकार आहेत. 


बीस्ट (Beast) : आगामी दाक्षिणात्य सिनेमांच्या यादीत विजयच्या 'बीस्ट' (Beast) सिनेमाचादेखील समावेश आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात विजयसोबत पूजा हेगडेदेखील दिसणार आहे. हा सिनेमा 13 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'केजीएफ 2' आणि 'बीस्ट' या सिनेमांत टक्कर होणार आहे. 


आदिपुरुष (Adipurush) : प्रभास (Prabhas) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. प्रभास लवकरच 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 12 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत सैफ अली खान आणि कृती सेनन दिसणार आहे. 


सालार (Salaar) : प्रभासच्या आगामी सिनेमांमध्ये 'सालार' (Salaar) सिनेमाचादेखील समावेश आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमात प्रभासशिवाय श्रुती हसन आणि जगपती बाबू दिसणार आहेत. हा सिनेमा 14 एप्रिलला तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. 


आचार्य (Acharya) : राम चरणचा आगामी आचार्य (Acharya) सिनेमा 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात राम चरण व्यतिरिक्त चिरंजीवी, काजल अग्रवाल, पूजा हेगडे आणि सोनू सूद हे कलाकार दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


Vibhuti Thakur : हिंदी मालिकेतील अभिनेत्री विभूती ठाकूरचा मोबाईल नंबर लीक, अश्लील मेसेजमुळे मनस्ताप


World Television Premiere : ब्लॉकबस्टर 'पावनखिंड'सिनेमाचा 'या' दिवशी होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर


Ranbir-Alia Wedding : आलिया-रणबीर 17 एप्रिलला पंजाबी रितीरिवाजांनुसार अडकणार लग्नबंधनात; हनिमूनचं ठिकाणंही ठरलं


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha