World Television Premiere : 'पावनखिंड' (Pawankhind) सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. 18 फेब्रुवारीला  'पावनखिंड' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता 12 जूनला 'पावनखिंड' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.


'पावनखिंड' सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले होते. आता हा सिनेमा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा सिनेमा 15 मे पासून सुरू होणाऱ्या 'प्रवाह पिक्चर' या नव्या वाहिनीवर दाखवला जाणार आहे. 


'पावनखिंड' सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. बाजीप्रभूंची गाथा सांगणाऱ्या 'पावनखिंड' सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले,  हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 


'पावनखिंड' सिनेमा पहिल्या पाच सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आहे. यासोबतच हेमंत ढोमे दिग्दर्शित मल्टीस्टारर 'झिम्मा' हा आणखी एक सुपरहिट सिनेमा प्रवाह पिक्चरवर पाहता येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ अभिनीत 'कधी आंबट कधी गोड' आणि 'प्रवास', सुपरस्टार स्वप्नील जोशीचा 'बाली', महेश मांजरेकर यांचा 'ध्यानीमनी', मल्टीस्टारर आणि समीक्षकांनी प्रशंसित 'कारखानीसांची वारी' येत्या काही आठवड्यांत प्रवाह पिक्चर वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येतील.


संबंधित बातम्या


Ranbir-Alia Wedding : आलिया-रणबीर 17 एप्रिलला पंजाबी रितीरिवाजांनुसार अडकणार लग्नबंधनात; हनिमूनचं ठिकाणंही ठरलं


Priyanka Chopra : लॉस एंजेलिसमध्ये मॅनहोलचं झाकण 'मेड इन इंडिया', प्रियांका चोप्राने शेअर केला फोटो


Bharat Majha Desh Ahe :'भारत माझा देश आहे' चा पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha