Ranbir-Alia Wedding : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या चर्चेत आहेत. 13 एप्रिलला मेहंदीपासून त्यांच्या लग्नसोहळ्याची सुरुवात होणार आहे. चेंबूरच्या 'आरके हाऊस'मध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 17 एप्रिलला आलिया-रणबीर पंजाबी रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. तर हनिमूनला स्वित्झर्लंडला जाणार आहेत. 


आरके हाऊसमध्ये सध्या आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. विवाहपूर्व सर्व सोहळेदेखील पंजाबी रितीरिवाजानुसार पार पडणार आहेत. आलिया भट्ट आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्याप दोघांच्याही कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 13 एप्रिल रोजी या जोडप्याचा मेहंदी सोहळा पार पडणार, असे म्हटले जात आहे. यानंतर हळद आणि संगीत कार्यक्रम पार पडणार आहे. 


कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आलिया-रणबीरच्या लग्नाला 450 मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील हजेरी लावणार आहेत. रिपोर्टनुसार, लग्नानंतर आलिया आणि रणबीर हनीमूनला स्वित्झर्लंडला जाणार आहेत.


आलिया-रणबीरच्या लग्नात 'हे' सेलिब्रिटी राहणार उपस्थित


अयान मुखर्जी, करण जोहर, आदित्य रॉय कपूर, विकी कौशल-कतरिना कैफ, रणवीर सिंह-दीपिका पदुकोण, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, झोया अख्तर, वरुण धवन, रोहित धवन, डिझायनर मसाबा गुप्ता, शाहरुख खान, अर्जुन कपूर, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​आणि अनुष्का रंजन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी लग्नाला उपस्थित राहणार आहेत.


संबंधित बातम्या


Ranbir-Alia Wedding : मुहूर्त ठरला! आलिया-रणबीर 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात


Ranbir Alia Wedding Guest List : रणबीर- आलियाच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी; पाहा वेडिंग गेस्ट लिस्ट


Hrithik Roshan,Saba Azad : एअरपोर्टवर ह्रतिक आणि सबा दिसले एकत्र; नेटकरी म्हणाले, 'ही लहान मुलीसारखी दिसते...'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha