Vibhuti Thakur : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री विभूती ठाकूरचा (Vibhuti Thakur) मोबाईल नंबर लीक झाला आहे. मोबाईल नंबर सोशल मीडियावर लीक झाल्याने अभिनेत्रीला नेटकरी अश्लील मेसेज करत आहेत. या सर्व प्रकरणाचा अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. भावनिकरित्यादेखील ती खचली आहे. 


विभूतीचा मोबाईल नंबर लीक होणं हा सायबर बुलिंगचा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर अनेक अनोळखी मंडळी तिला फोन आणि मेसेज करत आहेत. तर काही विकृत लोक अश्लील मेसेज करत असल्याने तिला मानसिक धक्का बसला आहे. 


अभिनेत्रीने एका कॉलरला फोन करून नंबर करा मिळाला विचारले असता त्याने सांगितले की इंस्टाग्राम अकाऊंटवरून नंबर मिळाला. तसेच संबंधित व्यक्तीनेच मला मेसेज आणि फोन करायला भाग पडले. या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्रीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.





संबंधित इंस्टाग्राम पेजवर पोलिस नक्कीच कारवाई करतील, असा विभूतीला विश्वास आहे. तसेच खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केलेल्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी अभिनेत्रीने तक्रार केली आहे. विभूती ठाकूर ही छोट्या पडद्यावरील 'तेरा यार हू मै' (Tera Yaar Hoon Main) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. 


संबंधित बातम्या


Yashoda : समंथा रुथ प्रभूच्या 'यशोदा'ची रिलीज डेट जाहीर, सिनेमात अॅक्शनचा तडका


World Television Premiere : ब्लॉकबस्टर 'पावनखिंड'सिनेमाचा 'या' दिवशी होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर


Ranbir-Alia Wedding : आलिया-रणबीर 17 एप्रिलला पंजाबी रितीरिवाजांनुसार अडकणार लग्नबंधनात; हनिमूनचं ठिकाणंही ठरलं


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha