Yashoda : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) 'यशोदा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा 12 ऑगस्टला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


समंथा रुथ प्रभू सध्या 'यशोदा' सिनेमामुळे चर्चेत आली आहे.  हा सिनेमा तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. समंथाने या सिनेमात फक्त अभिनयच नाही तर अनेक फाईट सीक्वेन्सेदेखील केले आहेत. समंथा नुकतीच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमात (O Antawa) गाण्यावर थिरकताना दिसली होती.





'यशोदा' हा सायन्स फिक्शन-थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात समंथा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. सिनेमात समंथासोबत वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पना गणेश, दिव्या श्रीपदा, प्रियांका शर्मा हे कलाकारदेखील दिसणार आहेत.  समंथा रुथ प्रभूचे सध्या अनेक प्रोजेक्टवर काम सुरू आहे. नुकतेच तिने शकुंतला सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. 


संबंधित बातम्या


World Television Premiere : ब्लॉकबस्टर 'पावनखिंड'सिनेमाचा 'या' दिवशी होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर


Tujhech Mi Geet Gaat Aahe : 12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'तुझेच मी गीत गात आहे...' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस


Shyamchi Aai : 'श्यामची आई' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात; मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha